तामिळनाडूतील राजेंद्र चोल आणि त्यांचे वडील राजराजा चोल यांच्या लष्करी पराक्रमाला आणि प्रशासकीय कौशल्याला ज्वलंत श्रद्धांजली वाहताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ जुलै २०२५) सम्राटांनी गाठलेली उंची प्रेरणास्थान असल्याचे सांगितले आणि देशाला विकसित राष्ट्र बनण्यासाठी एक प्राचीन रोड मॅप प्रदान केला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “चोल काळात मिळवलेली आर्थिक आणि सामरिक प्रगती आधुनिक भारतासाठी प्रेरणास्त्रोत आहे. विकसित राष्ट्र बनण्यासाठी, आपणही एकतेला प्राधान्य दिले पाहिजे; आपल्या नौदल आणि संरक्षण दलांना बळकटी दिली पाहिजे आणि नवीन संधी शोधल्या पाहिजेत, त्याचबरोबर आपल्या मूलभूत मूल्यांचे रक्षणही केले पाहिजे,” असे गंगाईकोंडा चोलापुरम येथे राजेंद्र चोला प्रथम यांच्या जयंतीनिमित्त आदि तिरुवतीराई उत्सवाच्या समारोपप्रसंगी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी राजेंद्र चोला प्रथम यांच्या सन्मानार्थ एक स्मरणार्थ स्मारक नाणे जारी केले. सुमारे १,००० वर्षांपूर्वी गंगेच्या मैदानावरील विजयी मोहिमेनंतर राजाने शाही चोलांची प्राचीन राजधानी गंगाईकोंडा चोलापुरम, बृहदीश्वर मंदिर आणि चोलगंगम, एक विशाल तलाव बांधला होता.
पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली की, केंद्र देशाच्या ऐतिहासिक चेतनेचे आधारस्तंभ म्हणून काम करण्यासाठी तामिळनाडूमध्ये दोन्ही सम्राटांचे भव्य पुतळे उभारेल. “राजराज चोल आणि राजेंद्र चोल यांचा वारसा भारताच्या ओळखीचा आणि अभिमानाचा समानार्थी आहे. चोल साम्राज्याचा इतिहास आणि वारसा भारताची खरी क्षमता दर्शवितो, असेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी राजराज चोलने एक शक्तिशाली नौदल बांधले; त्यांचा मुलगा राजेंद्र चोल पहिला याने ते मजबूत केले. चोलांनी स्थानिक प्रशासन मजबूत केले, त्यांच्या देशाच्या विविध क्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी व्यापक व्यापार आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित केले. चोल शासकांनी श्रीलंका, मालदीव आणि आग्नेय आशियापर्यंत त्यांचे राजनैतिक आणि व्यापारी संबंध वाढवले होते, असे निदर्शनास आणून दिले.
भारतानेही आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले, असे पंतप्रधान मोदी म्हणाले, आणि ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, जगाने आपल्या सार्वभौमत्वाला असलेल्या कोणत्याही धोक्याला देशाचा दृढ आणि निर्णायक प्रतिसाद पाहिला आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतिहासकारांनी चोल राजवटीला देशाच्या सुवर्णयुगांपैकी एक मानले होते याकडे लक्ष वेधून पुढे म्हणाले की, हे राजवंश केवळ त्यांच्या लष्करी ताकदीसाठीच नव्हे तर शतकानुशतके स्थानिक प्रतिनिधी निवडण्याची कुडावोलाई प्रणाली सुरू करून लोकशाहीची जननी म्हणून देखील ओळखले जात असे सांगितले.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक चर्चा आता पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संवर्धनाभोवती फिरते, परंतु आपल्या पूर्वजांना या मुद्द्यांचे महत्त्व खूप पूर्वीच समजले होते, असे चोलांच्या उत्कृष्ट जल व्यवस्थापन प्रणालींचा उल्लेख करून चोल राज्यकर्त्यांनी सांस्कृतिक एकतेचा धागा विणला होता. आमचे सरकार त्यांचे आदर्श पुढे नेत आहे, शतकानुशतके जुने एकतेचे बंधन मजबूत करण्यासाठी काशी तमिळ संगम आणि सौराष्ट्र तमिळ संगम यांच्या आचरणाचा यावेळी संदर्भ दिला.
पंतप्रधान मोदी पुढे ही म्हणाले की, गेल्या दशकात, राष्ट्राने आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मिशन मोडवर काम केले आहे. २०१४ पासून चोरीला गेलेल्या आणि परदेशात विकल्या गेलेल्या सुमारे ६०० प्राचीन पुतळे आणि कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३६ तामिळनाडूच्या होत्या.
पंतप्रधान मोदी यांनी शेवटी बोलताना म्हणाले की, देशाच्या शैव परंपरेलाही आदरांजली वाहिली आणि म्हटले की देशाची सांस्कृतिक ओळख घडवण्यात तिने महत्त्वाची भूमिका बजावली. जर जगाने तिरुमुलर, ‘अनबे शिवम’ (प्रेम हा देव आहे) ही शिकवण स्वीकारली तर अस्थिरता, हिंसाचार आणि पर्यावरणीय संकटे यासारख्या समस्या सोडवता आल्या असत्या, असेही यावेळी सांगितले.
तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, राज्यमंत्री थंगम थेन्नारसू आणि एस.एस. शिवशंकर आणि लोकसभा खासदार थोल. थिरुमावलवन हे सहभागी होते.
Marathi e-Batmya