राहुल गांधींच्या “७० साल” वाला काटछाट व्हिडिओप्रकरणी सायबर तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता शेअर

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या रणधुमाळीचा फायदा उठवित भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाच्या मूळ व्हीडीओत काटछाट करत चुकीचा व्हीडीओ व्हायरल दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी शेअर केला. तसेच या काटछाट केलेल्या व्हीडीओचा वापर राजकिय कारणासाठी केल्याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या ४० सेंकदाच्या व्हीडीओमध्ये राहुल गांधी यांनी ७० साल मे कुछ नही भी नही हुऑ…देख लिया असे म्हणताना दाखविले आहे. मात्र मूल व्हीडीओमध्ये ७० वर्षात काँग्रेसने काय केले याचा लेखाजोखा मांडत मागील पाच वर्षात मोदी सरकारने काय केले याचा आलेख मांडत भाजप सरकारवर टीका केली होती.
त्यामुळे मूळ व्हीडीओत काटछाट करून विकृत उद्देशाने हा व्हीडीओ व्हायरल केल्याची तक्रार साकेत यांनी सायबर क्राईमकडे केली आहे. तसेच या व्हीडीओप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

राहुल गांधी म्हणाले, जर माझ्याशी स्पर्धा करायची असेल तर ४ हजार कि.मी पदयात्रा करा राजकीय ओळखवरून पंतप्रधान मोदी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डवचले

न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ‘राजकीय वेगळेपण’ (political uniqueness) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *