आरोग्य विभाग भरती

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत वाढविली विभागाकडून मुदतवाढीची घोषणा

आरोग्य विभाग अंतर्गत गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३ पासून नोंदणी सुरू असून त्याची अंतिम तारीख १८ सप्टेंबर २०२३ होती. परंतु दुर्गम भागातील व इतर उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्रौ ११.५५ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी पण २२ सप्टेंबर रोजी रात्रौ ११.५५ वाजेपर्यंत असणार आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. अर्ज सादर करण्यास दिलेली ही मुदतवाढ अंतिम असून यापुढे मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही आयुक्त आरोग्य सेवा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

About Editor

Check Also

कर्नाटकातील सात जिल्ह्यातील पेट्रोलमध्ये प्रमाणापेक्षा इथेनॉलवरून राहुल गांधी यांची टीका ई२० बनले ४२० केंद्र सरकारकडून इंधनाच्या माध्यमातून नागरिकांच्या खिशातील पैशाची चोरी

कर्नाटकातील सात जिल्ह्यांतून — बेंगळुरू, कोलार, चिक्कबल्लापूर, बेंगळुरू ग्रामीण, रामनगर, मंगळुरू आणि तुमकुरु — नमुने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *