थायलंड-कंबोडियन सीमावर्ती भागातील ती मुर्ती बुलडोझरच्या सहाय्याने पाडली ती मुर्ती भगवान विष्णूची की गौतम बुद्धांची, पण भारत सरकारकडून नाराजी व्यक्त

थायलंड आणि कंबोडिया दरम्यान मागील काही महिन्यांपासून एकमेकांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यात येत होती. मात्र आता थायलंड आणि कंबोडियाच्या सीमावर्ती भागात उभारण्यात आलेली एक मुर्ती कोणी त्याला हिंदू धर्मातील विष्णूची तर काही जणांकडून ती तथागत गौतम बुद्धांची असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता थायलंड सरकारने ही मुर्तीच बुलडोझरच्या सहाय्याने पाडत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे या मुर्तीच्या पाडकामावरून भारत सरकारने आपली नाराजी थायलंड सरकारकडे व्यक्त केली.

तसेच या घटनेवरून देशातील काही हिंदूत्ववादी संघटनांनी थायलंड सरकारच्या कृतीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच मूर्ती पाडण्याच्या गोष्टीमुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असल्याची भावना हिंदूत्ववादी संघटनांनी व्यक्त केली. त्यामुळे भारत सरकारने याबाबत आपली नाराजी थायलंड सरकारकडे मांडली. तसेच अशा स्वरूपाच्या गोष्टी होऊ नयेत अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

त्यावर थायलंड सरकारने यासंदर्भात भारत सरकारला खुलासा देत असे स्पष्ट केले की, सदरच्या सिमावर्ती भागावर पुन्हा एकदा थायलंड लष्काराने वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे सदर जागेच्या व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदर मुर्ती हटविण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच या मुर्तीच्या परिसराला धार्मिकस्थळाचा दर्जा किंवा मान्यता मिळालेली नव्हती. त्यामुळे या मुर्तीला हटविण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

About Editor

Check Also

पंतप्रधान यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी तो फोटोच आरसा म्हणून दाखवला राज शिष्टाचार न पाळता अपमान केला असल्याच्या आरोपाला जशास जते उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्या अलिकडच्या राज्य दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *