Breaking News

Tag Archives: अजित पवार

‘निर्धार नारी शक्तीचा’: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय मेळावा

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा राज्यस्तरीय ‘ निर्धार नारी शक्तीचा’ या घोषवाक्याखालील राज्यस्तरीय मेळावा शुक्रवार १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष …

Read More »

नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम आढावा बैठकीत अजित पवार यांनी दिले हे निर्देश

राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात. पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने सूचविलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मुख्यमंत्र्यांच्या ७५ जणांच्या शिष्टमंडळाला परवानगी?

महाराष्ट्रातील बेकायदेशीर राजवटीच्या दावोस शिष्टमंडळाबद्दल असं कळतंय की, घटनाबाह्य मुख्यमंत्री जवळपास ५० लोकांचा वैयक्तिक ताफा घेऊन दावोस ला जात आहेत. ह्यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि इतरही बरेच जण समाविष्ट आहेत. पती-पत्नी जास्तीत जास्त समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काहींसाठी, त्यांच्या मुलांना देखील ही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेतले जात आहे. जवळजवळ ७० लोक …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदीच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी

देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. उद्योगाबरोबरच, पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. यासाठी केंद्र शासनाचा नियमित पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त …

Read More »

पंतप्रधान मोदी म्हणाले, युवकांच्या सामर्थ्यावर देशाची आर्थिक महासत्तेकडे

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. या पिढीला सामर्थ्यवान आणि कौशल्याधारित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या युवकांच्या सामर्थ्यावरच भारताची जगातील आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल सुरू आहे. अमृत काळातील पुढील २५ वर्षांच्या कालावधीत परिश्रम घेत तरुणांनी @२०४७ पर्यंत …

Read More »

अजित पवार यांच्या उपस्थितीत जळगांव कोल्हापूर येथील कार्यकर्त्यांनी केला पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते रमेश नागराज पाटील, सचिन पाटील यांच्यासह रावेर मतदारसंघातील माजी नगरसेवक, माजी सभापती, सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, विविध राजकीय पक्षांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश …

Read More »

घरकुल अनुदानाची रक्कम वाढवित राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीसाठी ५० हजार रूपयांचे अनुदान मिळत होते. मात्र केंद्रीय नगरविकास विभागाने अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार आता भूमीहिनांना घरकुल बांधण्यासाठी लागणाऱ्या जमीन खरेदीसाठी १ लाख रूपयांचे अनुदान देण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता …

Read More »

सत्यशोधक मराठी चित्रपट अखेर चार महिन्यासाठी करमुक्त

सत्यशोधक मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अयोध्येतील त्या गर्दीत जाणार नाही

पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही. ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे अशी उपरोधिक टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार …

Read More »

शिवकालीन पद्मदुर्ग किल्ल्याच्या विकासासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार

कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे हाती घ्यावीत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा. पद्मदुर्ग येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभागाने सहकार्य करावे, असे निर्देश …

Read More »