एनडीए आणि महायुतीचे गठबंधन म्हणजे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे एकत्र कुटुंब असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे, असेही यावेळी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी पक्ष वाचवण्यासाठी
भारतीय जनता पक्ष ही चेटकीण असून दुसऱ्यांचे पक्ष खाण्याचा रोग या पक्षाला जडला आहे. आधी त्यांनी विरोधी पक्ष खाल्ले आता मित्रपक्षांना खायला निघाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजपा शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी …
Read More »एकनाथ शिंदे यांचा दावा, नैसर्गिक शेती हीच भविष्यातील क्रांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राज्यपाल देवव्रत यांच्या उपक्रमाला पाठिंबा
नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी क्रांती घडेल आणि याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आपण सर्वांनी नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याचा संकल्प करूया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या नैसर्गिक शेती परिषदेत एकनाथ शिंदे बोलत होते. या …
Read More »एकनाथ शिंदे यांचे मत, आरएसएसवर बंदी घालण्याचे वक्तव्य दुर्दैवी संघ नेहमी राष्ट्रसेवेसाठी तत्पर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक कडवट देशभक्त आणि राष्ट्रभक्त संघटना आहे. देशावर संकट कोसळले की आरएसएस नेहमी मदतीसाठी पुढे सरसावते. आरएसएसवर बंदी घालण्याबाबतचे वक्तव्य हे दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याचे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते ठाणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा करणाऱ्या …
Read More »एकनाथ शिंदे म्हणाले, ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे; हरित ठाण्याची वाटचाल बंगळुरू विमानतळाप्रमाणे रत्नागिरी विमानतळाच्या बांधकामातही बांबूचा वापर करणार
मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात केवळ दहा ते पंधरा मिनिटांत हे अंतर पार करता येईल. सध्या मीरा-भाईंदर ते बोरिवली यासाठी दोन ते अडीच तास लागतात. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी …
Read More »असीम सरोदे म्हणाले, शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार नाही उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवरील सुनावणी १२ नोव्हेंबर पासून सुरु होणार
महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे झाल्यानंतर भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षाचे तुकडे झाले. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. परंतु त्यास मोठा कालावधी निघुन गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरपासून सुणावनी सुरु …
Read More »एकनाथ शिंदे यांचा इशारा, विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा उडवणार महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ दिवाळीच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचा विरोधकांना इशारा
विरोधकांनी आता कितीही लवंग्या-सुरसुरी फोडल्या, तरी आम्ही त्याकडे पाहतही नाही! कारण महायुतीकडे ॲटम बॉम्ब आहे आणि तो फुटला की विरोधकांचं राजकीय अस्तित्व उडून जाईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीसोबत महाराष्ट्राची जनता ठामपणे उभी आहे, म्हणूनच आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्ण …
Read More »मुंबई, देवळाली, अहिल्यानगर, पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख नमिता नाईक यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. तसेच उबाठा गटाचे दहिसर शाखा क्रमांक ७ चे शाखाप्रमुख अक्षय राऊत आणि युवासेना दहिसर विधानसभा चिटणीस नरेंद्र …
Read More »एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, तीन महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर मुंबई मनपा कर्मचारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा बोनस जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. यात बेस्ट मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणून देण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा निर्णय जाहीर केला आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेतील.. १. महानगरपालिका अधिकारी / …
Read More »एकनाथ शिंदे यांची टीका, कंबरडे मोडल्यावर हंबरडे फोडण्यात अर्थ नाही “माझ्या नादाला लागू नका, मी काम करणारा माणूस आहे” एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा
“नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने …
Read More »
Marathi e-Batmya