Tag Archives: एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री म्हणाले, अवकाळी पावसाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. राज्यातील अवकाळी पाऊस पडलेल्या तालुक्यातील आजपर्यंत प्राप्त प्राथमिक अंदाजे माहितीनुसार ९९ हजार ३८१ हेक्टर बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे …

Read More »

नाना पटोले यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहित शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

राज्यात मागील दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे अपार नुकसान केले आहे. राज्यातील जवळपास एक लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. शेतकऱ्याची आजची स्थिती पाहता नियम अटी, पंचनामे या प्रशासकीय कामात वेळ न घालवता तातडीने मदत देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता कोरडवाहू शेतीसाठी एकरी २५ …

Read More »

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर तीन डिसेंबरचे सावटः राज्यात मध्यावधी लागणार ?

देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम आता संपत आला आहे. पाच राज्यांपैकी मिझोरम, छत्तीसगड, राजस्थान ही तीन राज्ये पुन्हा एकदा काँग्रेस राखण्याच्या तयारीत आहेत. तर तेलंगणा आणि मध्य प्रदेश या राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी या पाचही राज्यांचा स्पष्ट कौल भाजपाला की, काँग्रेसला …

Read More »

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी होणार असा प्रश्न विचारला. त्यामुळे संतापलेल्या शिक्षण मंत्र्यांनी बेशिस्त शिक्षक आवडत नसल्याचे सांगत प्रश्नकर्त्या संभावित शिक्षक महिलेला डिसक्वालिफाय करण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडिओवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील मुंबई पालिकेकडे नाहीच

मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल कोविड काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता. पण कोविड काळातील ४ हजार कोटींचा खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या उत्तरातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात …

Read More »

एकनाथ खडसे यांचे खुले आव्हान, भरचौकात मला जोड्याने मारा नाही तर मी तुम्हाला.. गिरीष महाजन यांच्या टीकेवरून खडसे यांनी दिले आव्हान

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे आमदान एकनाथ खडसे यांना जळगावात हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्याची माहिती पुढे आली. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी एकनाथ खडसे यांचे प्राण वाचावे आणि त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत या उद्देशाने एअर अॅब्युलन्सची उपलब्ध करून दिली. त्यानंतर भाजपाचे आमदार तथा मंत्री गिरिष …

Read More »

निःशुल्क आरोग्य सेवेसाठी मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी”

मुंबई महानगरपालिकेच्‍या रुग्‍णालयात देण्‍यात येणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा व औषधोपचार नागरिकांना उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविण्यासाठी सविस्तर आढावा घेऊन सर्वंकष अहवाल सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांना दिले आहेत. “झिरो प्रिस्‍क्रिपशन पॉलिसी” राबविणारी मुंबई महानगरपालिका देशातली पहिली महापालिका ठरणार …

Read More »

प्रत्येक एस.टी स्टँडवर मिळणार “या” महिलांना स्टॉल एसटी महामंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला निर्णय

राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बसस्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे तसेच १० टक्के ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसेच दिव्यांगांना बसस्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एसटी महामंडळाला दिले. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी महामंडळात नवीन वर्षात ३ हजार ४९५ एसटी बसेस सेवेत …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची टीका, सरकारचे परीक्षार्थींना सबुरीचे गाजर

राज्यातील विविध विभागासाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षांचे निकाल महिन्यांपासून रखडल्यामुळे २५ लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असून इतर आश्वासनाप्रमाणे हे सुद्धा बेरोजगारांना प्रतीक्षेत ठेवून दिवस काढण्यासाठी दिलेले “सबुरी” चे गाजरच असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ हजार …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ निवारणासाठी.. .सरकारचा अक्षम्य हलगर्जीपणा वाढीव दुष्काळी महसूल मंडळांना सरकारने आर्थिक मदत करावी

दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आणि वेळ सरकारने पाळली नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक वेळीच घेतली नाही. सरकार सत्ता टिकवण्यात गुंग असल्याने प्रशासनावर वचक नाही. या सरकारच्या गोंधळामुळे आता दुष्काळ निवारणासाठीच्या निधीवर टाच आली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर करताना केलेल्या गलथानपणामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची …

Read More »