Breaking News

Tag Archives: केंद्रीय निवडणूक आयोग

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी अधिसूचना जारी १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार

राज्यसभेचे सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागी महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून एका सदस्याची निवडणूक घेण्यासाठीची सूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयामार्फत जारी करण्यात आली आहे. यानुसार उमेदवार अथवा त्याच्या सूचकाला १३ जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून निवडणूक लढविली गेल्यास २५ जून २०२४ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना पत्र, तुम्ही मागितलेली वेळ अमान्य माहिती आठवड्यात सादर करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ जून रोजी काँग्रेस नेते जयराम रमेश यांना लोकसभा निवडणुकीसाठी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीपूर्वी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यास नकार दिला. मतदान पॅनलने जयराम रमेश यांना अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेल्या आरोपांचे तपशील रविवारी संध्याकाळपर्यंत …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली होती तक्रार

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यात मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. मात्र मतदानाच्या दिवशी उष्णतेची लाट असतानाही मतदान केंद्रांवर अंत्यत धिम्या गतीने मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. त्यामुळे संध्याकाळपर्यंत ४८ टक्क्याच्या जवळपास मतदानाची आकडेवारी पुढे आली. त्यावेळी शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, जाहिर झालेले एक्झिट पोल खोटारडे, सरकारी अमित शाह यांच्यावरील आरोपावरून जयराम रमेश यांचे आयोगाला प्रत्त्युतर

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी “केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १५० जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना बोलावले होते” या दाव्यावर निवडणूक आयोगाने रविवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांच्याकडून अधिक माहिती मागवली. जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात, निवडणूक मंडळाने त्यांना आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी तपशील सामायिक …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी दुपारी १ वाजेपर्यंत ४० टक्के मतदान पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओ़डिशा, हिमाचल प्रदेश, झारंखड आणि चंदिगड मधील मतदान

लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील ५७ लोकसभा मतदारसंघात आज १ जून रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसीसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमधील ५७ मतदारसंघांसाठी मतदान होत आहे, जिथून वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिस-यांदा लोकसभा निवडणूकीसाठी उभे आहेत. दुपारी १ वाजेपर्यांत या ८ ही राज्यांमधील ५७ जागांवर ४० टक्के मतदान …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती, राज्यातील आचारसंहिता सध्या शिथिल नाहीच नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. आचार …

Read More »

विधान परिषद शिक्षक, पदवीधर आणि राज्यसभेसाठी २५ आणि २६ जूनला मतदान विधान परिषदेच्या चार जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेबाबत काही सूचना असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी दि.३० मे …

Read More »

निवडणूक आयोगाकडून पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी जाहिर मतदानानंतर किमान तीन ते जास्तीत जास्त दिवसही लागू शकतात

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानानंतर एकूण मतदानाची आकडेवारी जाहिर करण्यास उशीर करत असल्याच्या कारणावरून सर्वचस्थरातून निवडणूक आय़ोगावर टीकेची झोड उठलेली आहे. त्यातच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानासाठी मतदारांची परिपूर्ण संख्या जाहीर केली. निवडणूक आयोगाने सांगितले की त्यांनी आपल्या …

Read More »

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीची नवी तारीख जाहिर आता विधान परिषदेसाठी २६ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांसाठी निवडणूक होत असून सोमवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार मतदान केंद्र निहाय मतदानाची टक्केवारीची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्याची माहिती

सर्वोच्च न्यायालयाने २४ मे रोजी निवडणूक आयोगाला लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रनिहाय मतदानाचा डेटा आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश जारी करण्यासंदर्भात एडीआर या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एडीआरने दाखल केलेल्या याचिकेवर थेट अंतरिम दिलासा देण्याऐवजी एडीआरने दाखल केलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने नाकारत सदरची याचिका मुख्य …

Read More »