महाडीबीटी पोर्टलवरील प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वानुसार कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात पावनेतीन लाख तर राज्यात बत्तीस लाख लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी यांत्रिकीकरण योजनेत लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेतातील कामे जलदगतीने व वेळेत पुर्ण होण्यासाठी निवड …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, रब्बीचं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठाचं नियोजन राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक पुण्यात संपन्न
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्वाचा आहे. सध्या धरणं, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही. म्हणून यंदा रब्बी पिकाखालचं क्षेत्र ६५ लाख हेक्टर पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर, राज्यातील रब्बी हंगामाचे …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख लाभार्थ्यांची निवड योजनेतून विक्रमी शेतक-यांना मिळणार लाभ
महाडीबीटी पोर्टवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेंव्हा, या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. तसेच कृषी यंत्रे/औजारांवरील जीएसटी च्या …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा माहिती, शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करणार गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणिकरण संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार
राज्यातील सेंद्रीय प्रमाणित व नैसर्गिक शेती उत्पादक शेतक-यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासन शेतक-यांना मार्गदर्शन करत आहे. केंद्र शासन प्रमाणित संस्थाकडून राज्यातील शेतक-यांना देण्यात येणारे सेंद्रीय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार आढळल्यास अशा संस्थाचा केंद्र शासनाला अहवाल पाठवणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रालय …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेद्वारे नवा अध्याय महाराष्ट्रातील ९ जिल्ह्याची निवड
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. केंद्र सरकारने राज्यातील ९ जिल्ह्यांचा यात समावेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते उद्या दिल्लीत या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील जास्तीत जास्त …
Read More »मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, कृषी विभागातील कर्मचारी देणार एक दिवसाचे वेतन शेतकऱ्यांच्या संकटात शासकीय यंत्रणा केवळ प्रशासनापुरती मर्यादित नाही
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात हातभार म्हणून कृषी विभागाचे राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे वेतन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता …
Read More »सोलापूरमध्ये अतिवृष्टीचे थैमान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा ऑगस्ट मधील नुकसानाची मदत मंजूर, सप्टेंबर महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरच देण्यात येईल
सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. …
Read More »दत्तात्रय भरणे यांचा निर्धार, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी शासन प्रयत्नशील राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कृषी समृद्धी योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार
“कृषी विभागाकाडून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. तसेच नैसर्गिक संकटामुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी या कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे निर्देश …
Read More »दत्तात्रय भरणे यांचे आदेश एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा
जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. सप्टेंबर पूर्वीचा विचार केला तर नुकसान थोडं कमी …
Read More »कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची वाशिम जिल्ह्यातील बांधावर जात केली बाधित क्षेत्राची पाहणी पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी मंजूर
“अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. राज्यात पहिल्या टप्यात ७३ कोटी ९१ लाख ४३ हजार तर दुसऱ्या टप्यात ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा नुकसानग्रस्त निधी शेतक-यांना मंजूर झाला आहे. मंजूर केलेला निधी पुढच्या आठवड्यापासून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात …
Read More »
Marathi e-Batmya