Breaking News

Tag Archives: भाजपा

राजकारण सध्या ढवळतंय ? मग जनता कुठेय

२०१९ साली निवडणूका झाल्या आणि महाराष्ट्रासह देशात राजकिय कुरघोडींच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे सर्वांनी पाह्यलं. ह्या राजकिय कुरघोडींचा ऊत इतका आला आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका वर्षभराच्या अंतराने तोंडावर आलेल्या आहेत. तसेच त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही होऊ घातल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रासह देशात या कुरघोडींच्या राजकारणात नेमके कोण कोणावर …

Read More »

नवीन वैद्यकीय, परिचर्या आणि भौतिकोपचार महाविद्यालयांसाठी जायकाकडून अर्थसहाय्य

राज्यात वैद्यकीय शिक्षण व तृतीयक आरोग्य सेवेच्या विस्ताराच्या अनुषंगाने वैद्यकीय, परिचर्या व भौतिकोपचार अभ्यासक्रमाची नवीन शासकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सर्वसमावेशकपणे वाढविण्याचा शासनाचा मानस असून यासाठी जपान इंटरनॅशनल को- ऑपरेशन एजंसी (जायका) यांच्याकडून अल्प व्याजदरात घेण्यात येणाऱ्या अर्थसहाय्य संदर्भातील कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री …

Read More »

उद्योग विभागाचा रिन्यु पॉवर सोबत २० हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार

राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम आहे, उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. नविनीकरण (रिन्यूएबल) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, …

Read More »

विरोधकांच्या संयुक्त बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

भाजपाविरोधी ऐक्य दर्शवण्याकरता संयुक्त विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली. या बैठकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. कारण या बैठकीत देशभरातील २० हून जास्त विरोधी पक्षातील नेते उपस्थित राहिले होते. ही बैठक संपल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. तसंच, पुढची बैठक शिमल्यात होणार असल्याचंही त्यांनी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपाचा कुटील डाव

महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यासंदर्भात पत्रकारांशी …

Read More »

केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदेंच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का ?

सत्तांतराचे बंड यशस्वी झाले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती या दिपक केसरकरांच्या वक्तव्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात झालेल्या सर्वात मोठ्या सत्तांतराच्या नाट्यमय घटनाबाबत काही गोष्टींचा खुलासा …

Read More »

भाजपाची उद्धव ठाकरेंवर टीका,… तोंडी मुस्लिम लीगची भाषा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यामुळे हिंदूंना त्रास होणार असल्याचे सांगितले असून त्यांचे हे वक्तव्य घटनासमितीत समान नागरी कायद्याच्या मार्गदर्शक तत्त्वाला विरोध करणाऱ्या मुस्लिम लीगच्या नेत्याप्रमाणेच आहे. देशहिताच्या महत्त्वाच्या विषयावर मुस्लिम लीगची भाषा बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आता तरी आपण हिंदुत्व सोडले नाही असे सांगू नये, असे प्रतिपादन …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, ते अजूनही भाषणच ठोकतायत..

भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, आम्ही प्रश्न विचारला की तुमची…

२३ जूनला आम्ही पाटण्याला जाणार आहोत. नितीशकुमार मातोश्रीवर आले होते. भाजपासोडून सगळे मातोश्रीवर येतात. विरोधी पक्षांची एकजूट नाही तर स्वातंत्र्यप्रेमींची, देशप्रेमींची एकजूट आहे. जे देशावर प्रेम करतात त्यांनी आमच्या सोबत यावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी करत काल परवा अमित शाह आले होते आम्हाला प्रश्न विचारत होते. पण आम्ही विचारले …

Read More »

संजय राऊत म्हणाले,…तर २४ तासात देवेंद्र फडणवीस यांच्यासह सगळे शिवसेनेत…

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे, उपनेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी उधाण आले. या घटनेचा धागा पकडत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, आम्हीही उद्या सत्तेत आल्यानंतर ईडी-सीबीआयचा वापर सुरु केल्यानंतर २४ तासात देवेंद्र फडणवीस …

Read More »