Breaking News

Tag Archives: भाजपा

उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, शासन आपल्या दारी थापा मारतय भारी… देवेंद्र फडणवीस यांना काही म्हणणार नाही, नाही तर उगीच बोभाटा होतो

राज्यात सध्या निवडणूकांचे वारे वहात आहेत. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षसंघटनेच्या बांधणीच्या निमित्ताने सध्या मराठवाडा दौऱ्याच्या निमित्ताने हिंगोली येथे आलेले शिवसेना ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपावर टीकास्त्र सोडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीका …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवार यांची बीड येथे उत्तरदायित्व सभा होणारच… उद्याच्या सभेनंतर राज्यव्यापी दौरा करणार

बीडमधील प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन राज्यातील जनतेसमोर संवाद साधण्यासाठी बीड येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही उत्तरदायित्वाची सभा आहे. लोकांचे आम्ही उत्तरदायित्व मानत आलो आहे त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका व करायचे काम आणि ध्येयधोरणे याची स्पष्टता व्हावी. राज्यभर जे काही दौरे पुढच्या कालावधीत करणार आहोत त्या दौऱ्याची सुरुवात …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, जपानच्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या गुंतवणूकीची शक्यता मला देण्यात आलेली मानद डॉक्टरेट पदवी महाराष्ट्राचा गौरव

जपान सरकारच्या विशेष निमंत्रणावरून जपान दौऱ्यावर गेलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत आगमन झाले. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमनानंतर पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जपानच्या या दौऱ्यात जपान सरकारचे मंत्री, पंतप्रधानाचे सल्लागार, विविध कंपन्या, अधिकारी, प्रांतांचे …

Read More »

चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावणार १ सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून दर दिवशी कोकणात नियमित प्रवासी विमानसेवा सुरु होणार

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित …

Read More »

माजी राज्यपाल राम नाईक यांचे पहिल्या मत्स्योद्योग धोरण समितीच्या निमित्ताने पुर्नवसन धोरण समितीच्या अध्यक्ष पदी राम नाईक यांची नियुक्ती

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यांत मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत आता अंशतः बदल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या राज्यपाल पदी केंद्र सरकारने नियुक्ती केली की सदर राजकिय व्यक्तीचे निवृत्तीचे वय सुरु …

Read More »

वर्सोवा-विरार सी लिंकला जपान करणार संपूर्ण सहकार्य जपानचे आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी निशिमुरा यांची भेट घेतली. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, मेट्रो 3 प्रकल्पातील अडथळे दूर केल्याबद्दल त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानतानाच वर्सोवा-विरार सी लिंकला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी जपान सरकारच्या वतीने दिले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा जपान …

Read More »

ग्रामविकासच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका मंत्री गिरीश महाजन यांचे आवाहन

ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी, तसेच अशाप्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, नाफेडच्या दरातून कांद्याचा उत्पादन खर्च तरी निघतो का? कांद्याचे ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करत नाही तोपर्यंत संघर्ष सुरुच राहील

शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी भाजीपाल्यासह शेतमाल रस्त्यावर फेकून देत आहे. शेतकऱ्याचे हे दुःख पाहून सरकारला पाझर फुटत नाही एवढे निर्दयी लोक सत्तेत बसले आहेत. कांद्याचे निर्यात शुल्क वाढवल्याने भाव पडले आणि सरकार आता नाफेड मार्फत केवळ २ लाख टन कांदा २४१० रुपयाने खरेदी करणार आहे. या भावात कांद्याचा …

Read More »

कांदा प्रश्नावरून बच्चू कडू यांचा प्रहार, हे नामर्दाचं सरकार…फक्त ग्राहकांचा विचार करणार केवळ सत्ता टीकविण्यासाठी हे सगळं

नुकतेच राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेल्या दादा भुसे यांनी कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मरत नाही असे वक्तव्य करत जर कांदा महाग झालाय असं वाटत असेल तर खावू नका असे सांगत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यातच शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेल्या ४० टक्के शुल्कावरून राज्यात राजकिय …

Read More »

शिंदे गटाचा घरचा आहेर, कांद्यामुळे दिल्लीतील सरकार गेलं तर सरकारही हलतं त्यामुळे… शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी करून दिली काँग्रेस सरकारच्या काळातील गोष्टीची आठवण

काही वर्षापूर्वी दिल्लीतील राज्य सरकार आणि काँग्रेसचे सरकार कांद्याच्या वाढत्या किंमतीवरून सत्तेतून पाय उतार व्हावं लागले. तर कोरोना काळापासून देशासह राज्यातील जनतेला सातत्याने महागाईच्या प्रश्नाला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर तसेच कांद्याच्या प्रश्नावर देशातील जनता आणि शेतकरी यांचा रोष किती मोठा असतो याचे ढळढळीत उदाहरणच शिंदे गटाच्या आमदाराने मोदी सरकार …

Read More »