Breaking News

Tag Archives: सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांचा उपरोधिक सवाल, आता त्यांना आमचे लोकही हवे आहेत….

भाजपाकडे ऐवढी ताकद असताना सुद्धा आमच्याकडचे लोक हवेसे वाटत असतील तर, काही तरी दम आहे ना, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकऱ्यांसाठी कांदा निर्याती सारख्या महत्त्वाच्या विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा सवाल, सध्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस आहे ना?

सध्याचे सरकार असंवेदनशील सरकार आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. यामुळे दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहे. शेतकरी आक्रमक कधी होतात, जेव्हा अन्याय होतो. सरकारने अमानुषपणे अन्याय केला आहे. सरकार कष्ट करणाऱ्यांवर अन्याय करत आहे. अनेक अडचणी साखर कारखान्यांबाबत निर्माण झाल्या आहेत. परंतु हे प्रश्न खोके सरकार सोडवू शकत नाही असे राष्ट्रवादी …

Read More »

सुप्रिया सुळे यांची टीका, रात्रीची ती घटना म्हणजे राजकीय गुंडगिरीचा कळस

मुंबई उपनगरातील उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात जमिनीच्या वादातून स्थानिक भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे समर्थक महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्री झालेली घटना म्हणजे राजकिय गुंडगिरीचा …

Read More »

रोहित पवार यांची ईडीकडून अद्यापही चौकशी सुरुच, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने धाडसत्र राबविले. त्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचानालयाकडून आज चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार कर्जत जामखेडचे आमदार तथा शरद पवार …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, पिकविणारे जर संकटात तर खाणारे उपाशी…

संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला. बारामती …

Read More »

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय आयोगाच्या निष्कर्शानुसार रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या …

Read More »

शरद पवार, अजित पवारांच्या बालेकिल्यातील कामगार प्रश्नी भाजपा मंत्र्याची मध्यस्थी

राज्याच्या राजकारणातील हुकमी एक्का आणि बारामतीसह दौंड पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणारे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकिय बालेकिल्ल्यात आतापर्यंत कोणी घुसखोरी करू शकले नाही. मात्र पवार काका-पुतण्यात झालेल्या राजकिय मतभेदानंतर दौंड तालुक्यातील प्रसिध्द वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचे ४२ दिवस संप सुरु होता. वास्तविक पाहता पुणे जिल्ह्यातील कोणत्याही …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…

मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार …

Read More »

सुप्रिया सुळे यांचे आश्वासन,… सरसकट कर्जमाफी होईल भाजपाचं हे सरकार नसून दडपशाही

शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आज या मोर्चाचा तिसरा दिवस असून या मोर्चाने बारामती मतदार संघातील दौड येथून मोर्चात राष्ट्रवादी …

Read More »

अमोल कोल्हे यांचा टोला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर म्हणतात शेतकऱ्यांच सरकार पण…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आजपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी-जुन्नर येथून किल्ल्याच्या पायथ्यापासून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीन दिवस शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारा जागर चालणार आहे. शेतकरी मोर्चा च्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे सर्वसामान्यांचे प्रश्न …

Read More »