मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभाई पटेल (एस.पी.व्ही. नगर) मधील वसाहतीमध्ये ४९८ भुखंडांवरील सुमारे ४ हजार ९७३ सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प म्हाडाच्या माध्यमातून राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमीं देवेंद्र फडणवीस होते. अंधेरी (पश्चिम) येथील या भुखंडाचे जागतिक बँकेच्या प्रकल्पांतर्गत सन १९९३ मध्ये वाटप करण्यात आले होते. …
Read More »डीएलएफच्या पहिल्या प्रकल्पातील घरांच्या विक्रीची घोषणा २३०० कोटी रूपयांचा महसूल मिळणार
डीएलएफने त्यांच्या मुंबई प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी विक्रीची घोषणा केली आहे, ज्यामुळे २,३०० कोटी रुपयांचा विक्रीपूर्व महसूल निर्माण झाला आहे. ट्रायडंट रिअॅल्टीसोबत भागीदारीद्वारे मुंबई रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या डीएलएफसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जुलै २०२३ मध्ये, डीएलएफने अंधेरी पश्चिम, मुंबई येथे अंदाजे ३.५ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित …
Read More »अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तात्काळ दखल; पंकजा मुंडे पोचल्या थेट पाहणीला अनधिकृत भराव करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे पर्यावरण मंत्र्यांचे आदेश
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. आमदार अनिल परब यांच्या …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन, अंधेरी येथील ईएसआयसी हॉस्पिटल लवकरच आरोग्य सेवेत राज्य व केंद्र कामगार विमा मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली
राज्यातील जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी शासनाने प्राधान्य दिले आहे. अंधेरी येथील ईएसआयसी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे दुरुस्ती व नूतनीकरण काम प्रगतीपथावर आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होऊन हे हॉस्पिटल सर्व सुविधांसह जनतेच्या सेवेसाठी सज्ज करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. या …
Read More »मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व कोळी भवन उभारावे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे याचे निर्देश
दुबई आणि सिडनीच्या धर्तीवर अंधेरी पुर्व येथील मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार आणि कोळी भवन उभारण्यात यावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालय येथे बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मरोळ येथे मच्छिमार बांधवासाठी कोळी भवन व आंतराराष्ट्रीय दर्जाचे मासळी बाजार व मच्छिमार समस्यांची आढावा …
Read More »सेव्हन हिल्सवर महानगरपालिकेचा महिन्याला ९ कोटी खर्च तर दरमहा ४ कोटींचे नुकसान
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबईच्या आरोग्य सुविधांसाठी अत्यंत महत्वाचे व मोक्याचे हॉस्पिटल आहे, सध्या न्यायप्रविष्ठ असलेले हे हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेनेचे चालवले पाहिजे अशी सातत्याने मागणी केली जात आहे. २०२० पासून महानगरपालिका या हॉस्पिटलवर दरमहिना ९ कोटी रुपये खर्च करते आणि उत्पन्न केवळ ५ कोटी रुपये होत आहे. महापालिकेला महिन्याला …
Read More »काँग्रेसची मागणी, अंधेरीतील सेव्हन सिल्स हॉस्पिटल ताब्यात घ्या सेव्हन हिल्सच्या जागेत मेडिकल व नर्सिंग कॉलेजसह अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्याची संधी
अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघालेले असल्याने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल येथे सुरु करता येणे शक्य आहे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य …
Read More »अंधेरीचा विघ्नहर्ता मुंबापुरीतला २२ फुटांचा कागदापासून बनवलेला पहिला गणराज
मुंबई उपनगरात अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून ख्याती पावलेला बाळगोपाळ मित्र मंडळाचा गणेशोत्सव यंदा वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. कोव्हिडंनंतर पर्यावरण पूरक उत्सवाची कास धरताना मंडळाने यंदा सुमारे २२ फुटांची कागदी गणेशमूर्ती स्थापन केली आहे. बाळगोपाळ मित्र मंडळ यावर्षी ४९ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. अंधेरीच्या पूर्व भागातील प्रकाशवाडी परिसरात त्यावेळी कामगारवर्ग मोठया प्रमाणात …
Read More »काँग्रेसचा सवाल, अंधेरीतील कामगार रुग्णालयात पूर्ण वैद्यकीय सेवा नसतानाही उद्घाटन का ? केवळ अर्धवट OPD विभाग सुरु करुन कामगारांच्या तोंडाला पाने पुसली
अंधेरीतील कामगार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील सेवा दुर्घटनेनंतर तब्बल चार वर्ष आठ महिन्यांनी सुरु करण्यात आली आहे. १४ ऑगस्ट रोजी या विभागाचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला पण हा विभागही पूर्ण क्षमतेने सुरु झालेला नाही. या रुग्णालयातील सर्व सेवा अजूनही सुरु झालेल्या नाहीत. हे रुग्णालय पूर्ववत सुरु व्हावे यासाठी कामगार संघटना पाठपुरावा …
Read More »
Marathi e-Batmya