Tag Archives: अल्पसंख्याक

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, आरक्षणाशिवाय महिलांना प्रतिनिधित्व का नाही? सर्वात अल्पसंख्याक म्हणून कोण असेल तर महिला

सर्वोच्च न्यायालयाने महिलांना भारतातील “सर्वात मोठे अल्पसंख्याक” म्हणून वर्णन केले आहे ज्यांचे संसदेत अस्तित्व हळूहळू कमी होत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाच्या एकमेव महिला न्यायाधीश बी व्ही नागरत्न या म्हणाल्या की, “आरक्षणाशिवायही महिलांना प्रतिनिधित्व का देऊ नये?” असा सवाल केला. तसेच न्यायाधीश आर. महादेवन यांचा समावेश असलेले हे खंडपीठ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, दडपशाहीचे राज्य, संविधान व अल्पसंख्यांकांना संपवण्याचे प्रयत्न आम्ही भारत जोडोवाले, कुटुंब फोडणारे नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच

देशात लोकशाही व संविधानाला धाब्यावर बसवून राज्य कारभार सुरु आहे. आज सर्व समाज घटक दबावाखाली, भितीखाली जगत आहे. सत्तेतील लोक घाबरवण्याचे काम करत आहेत. याला न डगमगता एकता व अखंडतेची मशाल हाती घेऊन पुढे जाऊ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत दिलेल्या ‘डरो मत’ संदेश अंमलात आणू, …

Read More »

जयराम रमेश यांचा आरोप, अल्पसंख्यांकांचे धार्मिक अधिकार कायमचा काढून घेण्याचा प्रयत्न परंपरागत अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न

काँग्रेसने रविवारी वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संविधानावर “आणखी एक हल्ला” असल्याचा आरोप केला. २७ फेब्रुवारी रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेच्या संयुक्त समितीने प्रस्तावित केलेल्या सर्व १४ बदलांसह सुधारित वक्फ विधेयकाला मंजुरी दिली. काँग्रेस खासदार आणि संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी …

Read More »

पंतप्रधान मोदी यांना टॅग करत मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची सरकारी आकडेवारीच दाखवून दिली

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा देशातील जनतेने भाजपाला मतदान करत पुन्हा केंद्रातील सत्तेत विराजमान केले. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सबका साथ सबका विकासचा नारा दिला खरा मात्र या सरकारने एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप काढून घेतल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान मोदी यांना …

Read More »

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करा ६ सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२४-२५ करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत असून विद्यार्थ्यांनी दि. ६ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे. अल्पसंख्याक विभागामार्फत सन २०२४-२५ मध्ये राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी पदव्युत्तर …

Read More »

अल्पसंख्यांक बांधवांच्या विकासासाठी बार्टीच्या धर्तीवर मार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांना यश

राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी’, ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’, ‘अमृत’च्या धर्तीवर ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचे यश असल्याचे सांगत राज्यातील अनेक मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांच्या संस्था, संघटनांनी …

Read More »

चंद्रकांत हंडोरे यांची ग्वाही, मागासवर्गीय, अल्पसंख्याकांचा संसदेत आवाज उठवू

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले. विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली …

Read More »

अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढवून ५०० कोटी इतकी करण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या ३० कोटी इतकी शासन हमी देण्यात येते. या शासन हमीचा कालावधी ८ वर्षाचा राहील. या महामंडळाकडून मुदतकर्ज तसेच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम …

Read More »

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलात भरीव वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

महाज्योती, सारथी, बार्टी यासारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये समानता आणण्यासाठी गठित करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळालाही लागू करण्याचा आणि न्यायालयाचा कोणताही अडसर नसलेल्या पाच टक्के शैक्षणिक आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे …

Read More »