Tag Archives: चंद्रशेखर बावनकुळे

राज्य सरकारचा मोठा निर्णयः घरकुलांच्या लाभार्थ्यांसाठी ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू वाळू-रेतीबाबचे धोरण जाहीर, डेपो पद्धती ऐवजी लिलाव पद्धतीने विक्री

विविध योजनांमधील राज्यातील घरकूल लाभार्थ्यांसाठी ५ ब्रास पर्यंत मोफत वाळू उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयासह आज राज्याच्या वाळू-रेती निर्गती धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या पुढ़े नदी,खाडीपात्रातील वाळू, रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन विक्री (डेपो पद्धती) ऐवजी लिलावपद्धतीद्वारे करण्यात येणार आहे. नैसर्गिक वाळूचे पर्यावरणीय महत्त्व, नैसर्गिक वाळूचा …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा, गैरकारभार आढळला तर जागेवरच कारवाई करणार ठाणे आणि मिरा भाईंदरमधील नवीन बांधकामांबाबत सर्व परवानग्या घेतल्या असल्याची चौकशी होणार

ठाणे आणि मिरा – भाईंदर मध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरु आहेत. तर जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे. हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमीनींवर बोर्ड लावून त्या ताब्यात घ्याव्यात असे आदेश देतानाच …

Read More »

पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींसाठी रॉयल्टी फ्री खडी आणि माती गावातील मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी फडणवीस सरकारचा पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाणंद रस्ते, घरकूल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केला आहे. महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केला असून, यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा …

Read More »

महसूल सुनावण्या डिजिटल होणार! महसूल विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात 'प्रत्यय' ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी

राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने आज प्रत्यय ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू महसूल विभागाने आज महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, देवस्थान इनाम जमिनीबाबत कायदा करणार गोपीचंद पडळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

देवस्थान जमिनी या इनाम वर्ग ३ च्या जमिनी असून  त्या अहस्तांतरणीय आहेत. या जमिनीच्या प्रश्नासंदर्भात सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी प्रधान सचिव, महसूल यांच्या अध्यक्षतेखाली  समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर यासंदर्भात कायदा करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. देवस्थान इनाम जमीन संदर्भात सदस्य गोपीचंद पडळकर …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा, ५० तृतीयपंथीयांना विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करणार तृतियपंथियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा तृतियपंथियांची आघाडी गठित करणार

वंचित, उपेक्षित वर्गांची सर्वांगीण उन्नती तसेच त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्याचे लक्ष्य ठेवून भारतीय जनता पार्टीची  वाटचाल सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून समाजातील उपेक्षित अशा तृतियपंथी समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच भाजपातर्फे तृतियपंथीयांची आघाडी गठित करण्यात येईल अशी ग्वाही भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपा प्रदेश …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी वाळू धोरण विधान परिषदेत अंबादास दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे यांची माहिती

वाळू तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या राज्यात महसूल आणि पोलीस दलाकडून संयुक्त कारवाई करण्यात येते. परंतु राज्यात वाळू माफिया आणि वाळू तस्करीच्या घटना वाढतच आहेत. यासाठीच राज्य शासन सर्वंकष वाळू धोरण तयार करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेमध्ये दिली. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळे महाराष्ट्र बदलायचाय? आधी नागपूर, चंद्रपूर बदला न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही महसूल विभागाकडून भलतीच नावे सातबाऱ्यावर

राज्यात तिसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या दिवशी मोठ्या थाटामाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आता महाराष्ट्र बदलणार अशी घोषणा केली. इतकेच काय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुरात सुर मिसळत अर्थमंत्री अजित पवार यांनी तर अर्थसंकल्प सादर करताना अशीच घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल …

Read More »

पाच वर्षांत जाहीरनाम्यातील सर्व संकल्प महायुती सरकार पूर्ण करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही

विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेले सर्व संकल्प येत्या पाच वर्षांत महायुतीचे सरकार पूर्ण करेल, तसेच कोणतीही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी मंगळवारी दिली. अमरावती जिल्हा शिक्षक महासंघ अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेश प्रसंगी  बावनकुळे बोलत …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णयः विद्यार्थ्यांचा ५०० रुपयांचा भुर्दंड वाचला ५०० रुपयांची स्टॅम्प ड्यूटी रद्द- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

राज्यातील १० वी, १२वी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविधप्रकारच्या कागदपत्रांसाठी भरून द्यावे लागणाऱ्या ५०० रूपयांचे मुद्रांक शुल्क अर्थात स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागत होते. मात्र आता यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांना कोणत्याही लागणाऱ्या कागदपत्रांसाठी ५०० रूपयाचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र लिहून देण्याची गरज राहणार नाही. केवळ स्वःहस्ताक्षरात साध्या कागदावर …

Read More »