Tag Archives: डॉ पंकज भोयर

डॉ पंकज भोयर यांची माहिती, दक्षिण मुंबईतील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती दक्षिण मुंबईतील कामाठीपुरामधील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील पुनर्विकास व गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याबाबत राज्य शासन कटिबद्ध असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली. विधानसभेत सदस्य अमिन पटेल यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले की, कामाठीपुरा परिसरातील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि उपकरप्राप्त इमारतींचा समूह …

Read More »

मजूर संस्थांसोबतच महिला सहकारी संस्थांना कामे देणार राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली ग्वाही आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार ५ सदस्यीय समिती गठित

राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे राज्यातील मजूर सहकारी संस्था सोबतच प्राधान्याने महिला सहकारी संस्थांना शासनाच्या विविध कामांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली. सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत …

Read More »

आराजी वर्ग २ च्या जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

आराजी असलेल्या शेत जमिनीबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी आराजी असलेली वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी दिली. सदस्य सचिन अहिर यांनी या विषयी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित …

Read More »

महाराष्ट्रात धार्मिक स्वातंत्र्य विधेयक कायदा विधानसभेत सादर प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे धर्मांतर केल्यास शिक्षेची तरतूद ० धार्मिक धर्मांतराच्या ६० दिवस आधी लेखी सूचना आवश्यक

महाराष्ट्रात जबरदस्तीने धर्मांतर आणि तथाकथित “लव्ह जिहाद” रोखण्याच्या उद्देशाने, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शुक्रवारी विधानसभेत “धार्मिक स्वातंत्र्य विधेयक २०२६” सादर केले. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी हे विधेयक सभागृहात सादर केले. प्रस्तावित कायद्यानुसार, प्रलोभन, दबाव, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे केलेले धर्मांतर दंडनीय गुन्हा मानला जाईल. सर्वसाधारणपणे, यासाठी ३ ते ७ वर्षे तुरुंगवास …

Read More »

डॉ पंकज भोयर यांची माहिती, नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीला सुधारित धोरणाच्या आधारे गती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती

पोलीस ठाणे निर्मितीबाबत सुधारित धोरण तयार करण्यास गती देण्यात यावी, नवीन पोलीस ठाणेची निर्मिती करताना अनेक ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता, पोलीस कर्मचाऱ्यांवर वाढणारा कामाचा ताण यामुळे वस्तुस्थितीदर्शक माहितीच्या आधारे सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी दिले. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्रालयात गृहराज्यमंत्री …

Read More »

डॉ पंकज भोयर यांचे आश्वासन, पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प रहिवाशांच्या प्रश्नावर लवकरच विशेष बैठक विधानसभेत चर्चेच्या वेळी दिले आश्वासन

मुंबईतील गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर-पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांच्या दालनात सर्वसमावेशक बैठक आयोजित करण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर म्हणाले की, २००८ साली स्थानिक रहिवाशांनी हा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, हरवलेल्या महिला शोधण्यासाठी राज्यात स्पेशल सेल गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ

हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी राज्य शासनाने स्पेशल सेल तयार केला आहे. या सेलमध्ये अतिरिक्त महासंचालक (एडीजी) स्तराच्या महिला अधिकाऱ्यांना नेमण्यात आले आहे. या शोध मोहिमांचे नियोजन आणि अंमलबजावणी ते पाहतात. या विशेष सेलने केलेल्या कामामुळे गेल्या वर्षभरात सापडलेल्या महिलांची संख्या १० टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या …

Read More »

डॉ पंकज भोयर यांची ग्वाही, किडनी घोटाळ्यातील आरोपींना मोक्का लावणार बेकायदेशीर सावकारांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई सुरू

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या एका शेतकऱ्याला त्याची किडनी विकण्यास भाग पाडल्याच्या खळबळजनक प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. या गंभीर घटनेनंतर, राज्य सरकारने बेकायदेशीर सावकारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे आणि आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागू करण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या …

Read More »

शनिशिंगणापूर देवस्थानातील ऑनलाईन आर्थिक अपहार प्रकरणी दोघांना अटक गृह राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची विधानसभेत माहिती

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री शनैश्वर -शनिशिंगणापूर देवस्थानात ऑनलाईन पूजा, चढावा व लाईव्ह दर्शन सेवांमधून मोठ्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवस्थानातील दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य विठ्ठल लंगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात मंत्री डॉ. पंकज …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन ‘जेम्स अँड ज्वेलरी’ अभ्यासक्रम सुरू करणार जेम्स अँड ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन

‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात विश्व स्तरावर नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता आहे. यासाठी राज्य शासन कौशल्य (स्किल) विद्यापीठ अंतर्गत ‘जेम्स अँड ज्वेलरी’ क्षेत्रात कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करेल. ज्यामुळे निश्चितच या क्षेत्राच्या प्रगतीत सातत्य कायम राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »