राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला. दमणगंगा–वैतरणा–गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा–एकदरे– गोदावरी नदीजोड प्रकल्प तसेच कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भीमा नदी खोऱ्यात वळविण्यासाठी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केन बेतवा राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाची पायाभरणी वाघांच्या जंगलातून जात धरणाचे काम, काँग्रेसची टीका
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (२५ डिसेंबर) केन-बेतवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली. या प्रकल्पामुळे पन्ना व्याघ्र प्रकल्पाला धोका असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधानांवर टीका केली. केबीएलबी KBLP ने केन नदीचे पाणी यमुनेच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीत सोडण्यात येणार असल्याची कल्पना केली …
Read More »राज्यातील नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांचे मानले आभार
राज्यातील नार-पार-गिरणा हा प्रकल्प ७०१५ कोटी रुपयांचा असून, यात पश्चिमी वाहिनी नदीखोर्यातून १०.६४ टीएमसी पाणीवापर प्रस्तावित आहे. या प्रामुख्याने लाभ नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील ४९,५१६ हेक्टर सिंचन क्षेत्राला होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील कळवण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील २५,३१८ हेक्टर आणि जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. …
Read More »
Marathi e-Batmya