Tag Archives: नागपूर हिंसाचार प्रकरण

नागपूर प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझरः उच्च न्यायालयाने फटकारले अधिकाऱ्यांच्या वर्तनावर केले प्रश्नचिन्ह उभा

नागपूर शहरातील अलिकडच्या जातीय हिंसाचारात आरोपी म्हणून नाव असलेल्या व्यक्तींची घरे पाडण्यात ‘उद्धट’ दृष्टिकोन बाळगल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नागपूर महानगरपालिकेला (एनएमसी) फटकारले. मुख्य आरोपी फहीम खानची आई जेरुनिसा शमीम खान यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. त्यांनी खंडपीठाला सांगितले की २१ …

Read More »

नागपूरातील हिंसक प्रकरणानंतर औरंगजेबाची कबर आता नो ड्रोन झोन सोशल मिडीयावरील आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याच्या विरोधात पोलिस करणार कारवाई

मुघल शासक औरंगजेबाची कबर उघडून फेकून द्या म्हणून दोनच दिवसांपूर्वी नागपूरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. त्याचे पडसाद त्याच रात्री उमटत हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल शासक औरंगजेबाची कबर “नो ड्रोन” झोन म्हणून छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी घोषित केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने …

Read More »

विरोधक २७९ च्या प्रस्तावावर पण एकनाथ शिंदे यांचे उत्तर दोन शिवसेनेतील भांडणावर अनिल परब मला तुमची सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत, कमरे खालची वार मी करत नाही

विधान परिषदेत विरोधकांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून २७९ अन्वये प्रस्ताव दाखल करत त्यावर चर्चा सुरु केली. चर्चेनंतर विरोधकांच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे सभागृह नेते एकनाथ शिंदे यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली. मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणी उत्तर देता देता शिवसेना उबाठाचे अनिल परब यांनी फक्त हात वरून बोलण्याची परवानगी विधान …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, जावीपूर्वक हल्ला महाराष्ट्रात द्वेषाचा सुनियोजित कट नागपूरातील हिंसाचाराच्या घटनेवर व्यक्त केली प्रतिक्रिया

नागपूर शहरात दोन गटांत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप करत महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत या मागे राज्य सरकारमधील एक विषारी मंत्री उघडपणे द्वेष पसरवित असल्याचा आरोप केला. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत …

Read More »

नागपूरप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीस निवेदन करताना म्हणाले, छावा चित्रपटाने खरा इतिहास बाहेर आणला पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करणार, विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाने औरंगजेब कबरवरून आंदोलन

काल रात्री उशीराने नागपूरातील महाल परिसरात निर्माण झालेल्या दगडफेक, वाहने जाळण्याची घटना घडली. नागपूर शहर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून ओळखले जाते. तसेच महाल परिसरात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालयही आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भाजपाचा म्हणून ओळखला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून औरंगजेब …

Read More »