Tag Archives: प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक यांची माहिती, ५ वर्षात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता गाव तेथे नवी एसटी धावणार

एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ …

Read More »

एसटी भाडेवाढीवरून दोन उपमुख्यमंत्र्यांचे परस्पर विरोधी विधानेः मात्र भाडेवाढ तर लागू अजित पवार म्हणतात, भाडेवाढीची फक्त चर्चाः तर एकनाथ शिंदे म्हणाले, चांगल्या सेवेसाठी भाडेवाढ

राज्यातील महायुती सरकारमध्ये बाहेरून कितीही सारं काही अलबेल असल्याचे चित्र टीव्हीच्या कॅमेऱ्यासमोर दाखविण्यात येत असली तरी वास्तविक तशी परिस्थिती महायुतीतील नेत्यांमध्ये तशी नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच एसटी भाडेवाढीवरून मुख्यमंत्री पदानंतर महत्वाचे असलेल्या उपमुख्यमंत्री पदावरील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात मात्र मते-मतांतरे असल्याचे दिसून येत आहे. पंरतु या दोघांच्या …

Read More »

प्रताप सरनाईक यांची घोषणा एसटीची भाडेवाढ मध्यरात्रीपासून तर… फेब्रूवारी पासून रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढणार

हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक 25 जानेवारी 2025 (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे. वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटी बसस्थानकांवर ” हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे… राबविणार.. ३ कोटी रुपयांची बक्षिसे, राज्यात प्रथम येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटी रुपयांचे बक्षीस

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर एसटीच्या राज्यभरातील सर्व बसस्थानकांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ” हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान ” राबवण्यात येणार आहे. तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे या अभियानांतर्गत देण्यात येणार असून राज्यात ‘ अ ‘ वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला …

Read More »

क्रेडाई ने एसटीची जमीन विकसित करण्यासाठी योगदान द्यावे..! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

राज्यभरात पसरलेल्या एसटीच्या १३६० हेक्टर जमिनीचा विकास करण्यासाठी क्रीडाई (CRDAI) या संस्थेने आपला योगदान द्यावे. असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज ने भरवलेल्या प्रदर्शनाला भेट देते प्रसंगी बोलत होते. प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्यभरात ८४२ ठिकाणी १३६० हेक्टर …

Read More »

बीड अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना एसटी तर्फे १० लाखाची मदत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

बीड – परभणी मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला घोडका राजुरी येथील स्वराज हॉटेल जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ तरुण मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत! दुर्दैवाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची आयुष्य आपण परत आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला …

Read More »

दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या ५ हजार लालपरी बसेस खरेदी करणार एस टी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

एस. टी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या लालपरी बसेस खरेदी करणार आहे. यासाठी महामंडळ अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्यात येणार आहे, तसेच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीने भाडेतत्त्वावर बसेस न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. परिवहन आयुक्त कार्यालयात एसटी महामंडळ कामकाज आढावा बैठक परिवहन मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

मुंबई महानगरातील केबल कारला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तत्वतः मंजूरी प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती

मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) प्रस्तावित केबल कार प्रकल्पाला मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली. नवी दिल्ली येथे राज्य परिवहन मंत्र्यांच्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. एमएमआर MMR मधील शहरी वाहतुकीचा कायापालट करण्याच्या प्रकल्पाच्या क्षमतेवर प्रकाश टाकत सरनाईक यांनी …

Read More »

मुंबई महानगरात ‘केबल कार’, प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

रस्ते वाहतूक, रेल्वे तसेच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित होणे आवश्यक आहे. त्यासाठी या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (DPR) तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी दरम्यान या प्रकल्पाच्या सादरीकरणाद्वारे मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या दृष्टीने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे याचे प्रतिपादन, जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय..!

‘जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उभारण्यात आलेल्या “मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक …

Read More »