धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई महापालिकेवर २३६८ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक भार टाकण्यात आला आहे. प्रकल्पातून अपात्र ठरणाऱ्या धारावीतील नागरिकांना “रेंटल हाउसिंग”मध्ये स्थलांतरित करण्यात येणार असून, यासाठी अदानी धारावी पुनर्विकास प्रा. लि. तब्बल ५०,००० घरे उभारणार आहे. मात्र ही घरे बांधण्यासाठी जागा मिळावी म्हणून देवनार डम्पिंग ग्राउंड खाली करण्याचा प्रस्ताव …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, अदानी सरकारकडून मुंबईकरांची लुट मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ लाडक्या उद्योगपती मित्रासाठी भाजपा युती सरकार मुंबईकरांकडून आणखी किती पैसे वसूल करणार?
बीएमसीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात मुंबईकरांकडून मालमत्ता कराच्या नावाखाली विक्रमी ६,२०० कोटी रुपये वसूल केले असताना पुन्हा मुंबईकरांना लुटत आहेत. ही नवीन ईस्ट इंडिया कंपनी मुंबईकरांच्या खिशात सरळ हात घालत असून मालमत्ता करात तब्बल १२-१३% वाढ करण्याचा अदानी सरकारचा डाव आहे, असा गंभीर आरोप करत मालमत्ता करातील कोणत्याही वाढीला काँग्रेसचा तीव्र …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या २ लाख कोटींच्या प्रकल्पांचा घेतला आढावा हाजीअली येथे २ हजार क्षमतेचे वाहनतळ उभारा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सुमारे १ लाख ४१ हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित २५ हजार कोटी रुपयांच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यावेळी महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानभवनात झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »अनिल परब यांचा आरोप, बीएमसीच्या मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत ९० कोटींचा घोटाळा आर्थिक गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून चौकशी सुरू असतानाही घोटाळा
बीएमसीमधील उघड भ्रष्टाचाराच्या आणखी एक उदाहरण समोर आले असून त्यात बीएमसीने प्रतिबंधात्मक पद्धती आणि निवडक अटी वापरून मिठी नदी गाळ काढण्याच्या निविदेत फेरफार केल्यामुळे बीएमसीचे ९० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर एसआयटीकडून चौकशी सुरु असताना हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे विधान परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी आज …
Read More »पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार
पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने …
Read More »रविंद्र वायकर विरोधातील प्रकरण बंदचा अहवाल न्यायालयाने स्वीकारला जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून दाखल केला गुन्हा
जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून पंचतारांकित हॉटेल बांधताना माहिती दडवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून वेगवेगळ्या परवानग्या मान्य केल्याप्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) खासदार रविंद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल महानगरदंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला. त्यामुळे, रविंद्र वायकर यांना दिलासा मिळाला आहे. …
Read More »खिचडी घोटाळा प्रकरण : सुरज चव्हाण यांचे अटकेला आणि ईडी कोठडीला आव्हान उच्च न्यायालयाने बजावली प्रतिवाद्यांना नोटीस
कोरोनाकाळात मुंबई पालिकेतील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सुरज चव्हाण यांनी अटकेला तसेच सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) कोठडीला आव्हान दिले आहे. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाध्यांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना १७ जानेवारीला खिचडी घोटाळा प्रकरणी …
Read More »आदित्य ठाकरे यांची खोचक टीका, ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील फरकच कळत नाही
राज्यातील सरकार हे दिल्लीच्या आशिर्वादाने बसलेले सरकार आहे. या सरकारकडून दिल्लीच्या आदेशानेच मुंबईची लूट करण्यात येत आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी राज्याच्या लोकायुक्तांना पत्र लिहीत मुंबईतील फर्निचर घोटाळ्याप्रकरणाकडे लक्ष वेधले. त्यानुसार लोकायुक्तांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना सुनावणीसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती युवासेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरमधील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, मुंबई, उपनगरांमधील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या… मुंबईतील प्रत्येक भागात स्वच्छतेचे काम मोहिम स्वरुपात करावे
मुंबई शहर व उपनगरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महापालिका आयुक्तांना दिले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबई शहरातील स्वच्छता, प्रदूषण याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबईतील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांबाबत देखील चर्चा झाली. मुख्य सचिव मनोज सौनिक, महापालिका आयुक्त …
Read More »मुंबईच्या ओपन स्पेस अडॉप्शन पॉलीसी चर्चेसाठी बोलावली बैठक प्रशासन आणि नागरिकांनाही बोलावले चर्चेला
मुंबई महापालिकेतर्फे ९ सप्टेंबर २०२३ रोजी ‘ओपन स्पेस अडॉप्शन पॉलिसी’चा मसुदा प्रसारित करण्यात आला आहे. या धोरणा अंतर्गत महानगरपालिकेची मालकी असलेल्या जागा, देखभाल करण्यासाठी खाजगी तत्वावर दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याद्वारे शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी …
Read More »
Marathi e-Batmya