Tag Archives: मंत्री दादाजी भुसे

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत

पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार १६ जून रोजी तर विदर्भात सोमवार २३ जून २०२५ पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. शाळेची गुणवत्ता वृद्धींगत करण्यासाठी व …

Read More »

द्राक्ष शेतावरील प्लास्टिक आवरणावर अनुदान देण्यास शासन सकारात्मक मंत्री दादाजी भुसे यांची विधानसभेत माहिती

द्राक्ष फळ पीके संवेदनशील आहे. अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळ वारा यामुळे द्राक्ष फळ पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. द्राक्ष फळ पिकाच्या शेतीवर प्लास्टिक आवरण असल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी शासन प्लास्टिक आवरणासाठी अनुदान देण्यास सकारात्मक आहे, असे मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. द्राक्ष उत्पादकांच्या …

Read More »

मुंबईतील या रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्री दादाजी भुसे यांनी मांडला ठराव

विधानसभा निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना जाहिर करण्याची घाई करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना जाहिर करण्यात आली. त्याच धर्तीवर आता मराठी भाषेच्या मुद्यांवरून पुन्हा एकदा मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य …

Read More »

नाना पटोले यांची टीका, खोकेवाल्यांच्या सरकारमध्ये खोक्यांसाठी मारामारी

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात असा प्रकार होणे चुकीचे आहे. भारतीय जनता पक्षाने सुरु केलेल्या राजकारणामुळे सभागृहाचा आखाडा झाला असून विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर …

Read More »

दोन महिन्याच्या आत राज्यातील एसटी बसस्थानकांचे सुशोभीकरण

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे २५१ एसटी बस आगार, ५७७ एसटी बस स्थानके आहेत. एसटी महामंडळाकडे भाडेतत्त्वावर ४६७ बस असून महामंडळाच्या स्वमालकीच्या १५ हजार ७९५ एसटी बसेस आहेत. या बसेस मधून दररोज ५४ लाख प्रवासी प्रवास करीत असतात. एवढे मोठे जाळे असलेल्या महामंडळाच्या एसटी बस स्थानकांचे दोन महिन्याच्या आत सुशोभीकरण व …

Read More »

नाना पटोले, सुषमा अंधारे यांच्या मागणीला यशः ससूनप्रकरणी चौकशी समिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

ससून रूग्णालयात ललित पाटील भूषण पाटील या अंमली पदार्थ तस्करांना दाखल करून घ्यावे या मागणीसाठी सत्ताधारी पक्षाचे मंत्री दादाजी भुसे यांनी रूग्णालय प्रशासनाला फोन केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याननुसार या प्रकरणातील सत्य बाहेर …

Read More »