Tag Archives: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण, राज्यात ४०० केंद्रांच्या माध्यमातून चार लाख जणांना रोजगार ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार: मंत्रिमंडळाची मंजूरी

शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतीमानतेवर भर देणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ (Global Capability Centre) आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून …

Read More »

मंत्रिमंडळाचा निर्णयः बेकायदेशीर जाहिरात फलक प्रकरणी एका महिन्यात कारवाईचे आदेश घाटकोपर बेकायदेशीर जाहिरात फलक दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशी समितीचा अहवाल स्विकारला

मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारण्यास. तसेच समितीचे निष्कर्ष, व सुचविलेल्या उपाययोजनांवर करावयाच्या अंलबजावणीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावर संबंधित विभागांना एक महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी दोन निर्णयांना मंजूरी अकोला जिल्ह्यातील पाटबंधारे योजनांसाठी निधी मंजूर, इंटीलिजन्स ब्युरोला भूखंड

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अकोला जिल्ह्यातील दोन लघुबंधारे योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर केंद्र सरकारच्या इंटेलिजन्स ब्युरोच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घरांचे बांधकाम करण्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील घोंगा, कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती होणार घोंगासाठी ४ कोटी ७६ लाख, तर कानडीसाठी ४ कोटी ९२ …

Read More »

राज्य सरकारचा निर्णय, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापन करण्यास तसेच आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्रीय स्तरावर देशात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्याकरिता दोन स्वतंत्र आयोग आहेत. या दोन्ही आयोगांशी निगडीत विषय वेगेवगळे आहेत. त्यामुळे दोन स्वतंत्र …

Read More »

राज्य सरकार झाले मेहरबान, आता भिकाऱ्यांना मिळणार दररोज ४० रूपये मेहनताना भिक्षागृहातील व्यक्तीला आता पाच रुपयांऐवजी ४० रुपये देण्याच्या नियमात १९६४ नंतर प्रथमच बदल

भीक मागण्याचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भिक्षागृहातील व्यक्तिचे पुनवर्सन करण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या कामासाठी दररोज चाळीस रुपये मेहनताना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आतापर्यंत १९६४ पासून दरमहा पाच रुपये मेहनताना दिला जात असे. भीक मागण्याची वृत्ती कमी …

Read More »

एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला दिलेला निधी देवेंद्र फडणवीसांकडून अखेर रद्द राज्य मंत्रिमंडळात मंजूर केलेला निधी चुकीचा म्हणून अखेर रद्द

राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने विविध समाजघटकांना खुष करण्याचा सपाटाचा लावला होता. त्यावेळी शेवटच्या दिवसात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्फ बोर्डाला १० कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच वक्फ बोर्डाशी संबधित एका …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मुंबईच्या एन्ट्री पाँईटवर टोल माफ पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, एसटी बस, शाळा बस, कार यांना टोल माफी

अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढः आयटीआय संस्थांचे नामकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

रमाई आवास योजना (ग्रामीण) व शबरी आवास योजना (ग्रामीण) या योजने अंतर्गत घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची रमाई आवास योजना (ग्रामीण) व आदिवासी विकास विभागाची शबरी आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत साधारण क्षेत्र …

Read More »

भूखंड प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती, ती ट्रस्ट माझ्या मालकीची नाही… विरोधकांच्या टीकेनंतर बावककुळे यांचा खुलासा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी रूपयांची जमिन स्वस्त दरात दिल्याप्रकरणी विरोधकांनी आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी ती ट्रस्ट माझअया मालकीची नसल्याचा दावा केला. बावनकुळे अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील महालक्ष्मी जगदंबा ट्रस्ट कोराडीला पाच कोटी …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मेकॅनिझम कार्यक्रम राबविणार आतंरराष्ट्रीय कृषी विकास निधीतून मिळणाऱ्या कर्जातून अनुदान देणार

नव तेजस्विनी – महाराष्‍ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाच्या मुदतीत एक वर्षाची वाढ करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आता सहा ऐवजी सात वर्षांच्या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. याशिवाय या कार्यक्रमात जेंडर ट्रान्सफॉरमेटीव्ह मॅकॅनिझम (Gender Transformative Mechanism- GTM) लिंग परिवर्तनीय यंत्रणा राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »