राज्यातील नागरी भागातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याच्या पुनर्वापराद्वारे चक्रीय अर्थव्यवस्थेस चालना देण्याचे धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणाच्या अंमजबजावणीसाठी नगरविकास विभाग समन्वयक म्हणून काम करेल. त्यासाठी या विभागाला ५०० कोटी देण्याच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली. राज्यात ४२४ नागरी स्थानिक संस्था आहेत. …
Read More »मंत्री उदय सामंत यांची माहिती, लंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ लंडनमधीन महाराष्ट्र मंडळाची इमारत शासन घेणार
राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला ९९ वर्षांच्या करार तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांचा धनादेश महाराष्ट्र मंडळ लंडनचे ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे सह्याद्री अतिथिगृह येथे …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते. राज्याचे कृषीमंत्री …
Read More »वाढवण बंदर ‘फ्रेट कॉरिडॉर’ बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणार १०४. ८९८ किलोमीटरचा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग, अंतर, वेळ, इंधनाची बचत
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर (तवा) आणि हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. चांदवड, जि. नाशिक) येथे यांना जोडण्यात येणार आहे. या १०४. ८९८ किलोमीटरच्या शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा …
Read More »राज्यात ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे पुरस्कार अभियान राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच या अभियानातील पुरस्कारांकरिता दरवर्षी २९० कोटी ३३ …
Read More »शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध मात्र राज्य मंत्रिमंडळाची मान्यता महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद
राज्यातील वर्धा ते सिंधुदूर्गला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला आधीच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. तसेच काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या जमिनी द्यायच्या नाहीत असा निश्चिय असताना हा प्रकल्प काहीही करून पुर्ण करायचा असा चंग राज्य सरकारने बांधला आहे. त्यामुळेच आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या ई बैठकीत शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजूरी दिली. …
Read More »अपात्र धारावीकरांचे पुर्नवसन कुर्ला येथील मदर डेअरीच्या जागेवर होणार धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन हस्तांतरणाच्या करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणा
मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या कुर्ला येथील मदर डेअरी अर्थात मातृदुग्धशाळेची जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी १४ जून २०२४ च्या …
Read More »शेतीच्या वाटप पत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
शेत जमिनीच्या वाटपपत्राच्या दस्तावर आकारण्यात येणारे नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ नुसार शेत जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस्तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते. शेत जमिनीच्या वाटप …
Read More »शेतकऱ्यांसाठीचा १ रूपयात विमा बंद, आता नवी पीक विमा योजना पीक विमा योजनेत बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना
राज्यात नव्याने भाजपा प्रणित महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकाऱ्यालाही १ रूपये कोणी देत नाही तेवढ्या पैशात पीक विमा देत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर दोनच महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीक विमा योजनेत बदल करत १ रूपयात पीक योजना बंद केली. तसेच …
Read More »जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा, जहाज पुनर्वापर सुविधा धोरणास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्याच्या जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण-२०२५ ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्याच्या सागरी क्षेत्राची गरज, बाजार पेठांची स्थिती, उद्योजकांच्या अपेक्षा या बाबी लक्षात घेऊन बंदर विकास धोरणात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्र सागरी विकास धोरण-२०२३ अनुसार अंमलबजावणी …
Read More »
Marathi e-Batmya