Tag Archives: राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर यांचे सरकारला निर्देश, घेतलेला टोल परत द्या ई-वाहनांना टोलमाफीची आठ दिवसात अंमलबजावणी करा

राज्यातील ईव्ही व ई-बाइक वापरकर्त्यांना टोलमाफी देण्याबाबत पुढील आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देत या निर्णयाच्या अंमलबजावणी पासून आज पर्यंतच्या काळात टोल घेतला गेला असल्यास पुरावा सादर केल्यावर नागरिकांना टोल परतावा द्यावा, असे आदेश विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले. ई वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य …

Read More »

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्व्शभूमीवर निर्णय

राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या ३० सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात येत …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, भायखळ्यातील ‘उर्दू शिक्षण केंद्र’ प्रकरणी बैठक बोलवा सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशांना शासनाने बगल दिल्याचा केला आरोप

भायखळा मधील‘उर्दू शिक्षण केंद्र’चा निर्णय संबंधितांची बैठक घेवून करण्यात येईल, असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले असतानाही महापालिका आणि पालकमंत्री यांनी ‘उर्दू शिक्षण केंद्रचा भूखंड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देवून विधानसभा अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा अवमान केला असून या प्रकरणी संबंधित लोकप्रतनिधींची बैठक बोलावावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, जल-जंगल-जमीन या तिन्ही घटकांवर आदिवासींचे हक्क देशाच्या मूळ संस्कृतीचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीचा खरा रक्षक आदिवासी समाज

आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन हा दिवस केवळ आदिवासी समाजासाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.कारण आदिवासी समाज हा आपल्या देशाच्या मूळ सांस्कृतिचा, परंपरांचा आणि नैसर्गिक संपत्तीच्या जतनाचा खरा रक्षक आहे. असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त राज्याचे अन्न …

Read More »

महाराष्ट्र नायक कॉफी टेबल बुकचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्य प्रेरणादायी असून त्यांनी महाराष्ट्राला अल्पावधीत प्रगतीपथावर नेले, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘महाराष्ट्र नायक’ या विशेष कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी. …

Read More »

धमकीच्या मुद्यावर बोलू न देता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सगळे आमदार माजलेत असे… पडळकर-आव्हाड प्रकरणाच्या पडसादावरील चर्चेत बोलताना व्यक्त केली भूमिका

पडळकर-आव्हाड प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत खेद व्यक्त करायला लावला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी या प्रकरणाशी संबधित आमदाराने धमकी दिल्याचा मुद्दा उपस्थित करताना भाजपाच्या सदस्यांनी आव्हाड यांना …

Read More »

पडळकर-आव्हाड प्रकरणाचे विधिमंडळात पडसाद, विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय अधिवेशन काळात अभ्यागंताना प्रवेश बंदी, पडळकर-आव्हाडांना खेद व्यक्त करायला लावला

काल संध्याकाळी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी विधिमंडळाच्या इतिहासतील काळी घटना घडवून आणली. त्यानंतर विधिमंडळातील सुरक्षा रक्षकांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी पडळकर-आव्हाड यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करून अटक केली. आज सकाळी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. तेव्हा विधान परिषदेतही या प्रश्नी विरोधकांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सार्वजनिक सुरक्षा विधेयकामुळे शहरी नक्षलवाद, लोकशाहीविरोधी संघटनांना आळा हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्या विरुद्ध

बहुचर्चित महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४ गुरुवारी विधानसभेत बहुमताने मंजूर झाले. सभागृहात, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवाद आणि लोकशाहीविरोधी संघटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे विधेयक डाव्या पक्षांच्या आणि कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तर डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्याविरुद्ध आहे आणि त्याचा गैरवापर होणार नाही, …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण, काळ्या इतिहासाच्या खुणा पुसल्या ऐतिहासिक सिंदूर (कर्नाक) पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

दिडशे वर्षांपासून या पुलाला कर्नाक पूल म्हणून ओळख आहे. भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा कर्नाक हा ब्रिटीश गव्हर्नर असल्याने त्याच्या काळ्या इतिहासाच्या खुणा पुसण्यासाठी कर्नाक पुलाचे सिंदूर नामकरण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डी’ मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचे कर्नाक) …

Read More »

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मनोगत, राज्यघटनेमुळे कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात गौरव

भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले. विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश …

Read More »