पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक हजार फ्रेशर्स पदवी धारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या प्रकरणात कामगार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित प्रकरण पोलिसांकडे वर्ग केले असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. हिंजवडी आयटी पार्कमध्ये १,००० फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याने पैसे परत …
Read More »माधुरी मिसाळ यांची माहिती, न्यायालयीन आदेशानंतरच सीसी-एमपी कोर्सचे प्रमाणपत्र वितरण सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी" (सीसी-एमपी) कोर्स प्रकरण न्यायालयात प्रलंबित
ग्रामीणसह इतर भागात वैद्यकीय सेवांची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या “सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी” (सीसी-एमपी) कोर्ससंदर्भातील प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असून अंतिम आदेश येईपर्यंत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत दिली. या संदर्भात विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड यांनी लक्षवेधी उपस्थित केली होता. …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आदेश, योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई नाना पटोले यांच्या प्रश्नावर मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर शासनाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली. योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) आधारित यंत्रणेचा वापरही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या …
Read More »नरहरी झिरवाळ यांची माहिती, ‘ब्लिंकइट’द्वारे कालबाह्य अन्न वितरण प्रकरणात कंपनीवर कारवाई विधानसभेत भीमराव तापकीर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना माहिती
पुणे शहरात ब्लिंकइट या ऑनलाईन अन्न वितरण सेवेच्या माध्यमातून कालबाह्य खाद्य पदार्थांचे वितरण होत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने चौकशी केली असता प्रारंभी कोणताही ठोस पुरावा सापडला नव्हता. मात्र लेखापरीक्षण अहवाल आणि संबंधित कागदपत्रांचा अभ्यास केल्यानंतर काही दिवसांपूर्वी ‘ब्लिंकइट’च्या माध्यमातून कालबाह्य अन्न वितरित झाल्याचे स्पष्ट झाले. कंपनीवर …
Read More »दत्तात्रय भरणे यांची माहिती, पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीचे निकष बदलण्यासाठी पाठपुरावा सुरू विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली ग्वाही
पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये शेतक-यांचा समावेश होण्यासाठी शासन केंद्राकडे पाठपुरावा करत आहे असल्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. पंतप्रधान किसान सन्मान निधी व राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेपासून राज्यातील तसेच सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत. तरी या …
Read More »भावविवश रोहित पवार म्हणाले, दादांची वर भेट झाल्यावर हे बटण लावेन, तोपर्यंत दादांच्या जाण्याने राजकारणातील मिश्किल पणा गेला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अजित पवारांचा शोकप्रस्ताव मांडला. त्यावर बोलताना आज अनेक नेते भावूक झाले. यात अजित पवारांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचाही समावेश होता. रोहित यांना अजित पवारांच्या आठवणी सांगताना आज सभागृहात अश्रू अनावर झाले. यावेळी रोहित पवार यांनी अजितदादांच्या अपघातासाठी …
Read More »बिहार निवडणूकीत भाजपा आणि जेडीयू प्रत्येकी १०१ जागा लढविणार लोक जनशक्ती पक्षाला २९ जागा, जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाह प्रत्येकी ६ जागा
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि जनता दल (युनायटेड) प्रत्येकी १०१ जागांवर समान संख्येने निवडणूक लढवतील. २००५ नंतर पहिल्यांदाच जागावाटपात भाजपाने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाशी बरोबरी साधली आहे – जेडी(यू)चा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील कमी होत चाललेला प्रभाव दर्शविणारा हा एक स्पष्ट संकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह …
Read More »काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी घेतली भेट
विधान परिषदेतील शिवसेना उबाठाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आमदाराकीचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत पदा सध्या रिक्त आहे. तर शिवसेना उबाठाच्या संख्याबळानंतर काँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणार मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना अधिक गती
मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होईल. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील …
Read More »आदित्य ठाकरे यांच्या चड्डी-बनियन गँगच्या उल्लेखावर निलेश राणे यांचे आव्हान हिंमत असेल तर नाव घेऊन बोला, उगाच मोघम बोलू नका
महाराष्ट्र विधानसभेत आज शिवसेना (उबाठा)चे आमदार आदित्य ठाकरे यांनी २९३ च्या प्रस्तावावर बोलत होते. यावेळी प्रस्तावावरील भाषण संपविताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे अभिनंदन करत त्यांच्याकडून युतीचा धर्म पाळण्यात येत असून ज्या चड्डी-बनियनवर कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावर कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांचे खरेच आभार मानायला पाहिजे असे सांगत आपले …
Read More »
Marathi e-Batmya