बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, परभणी व बीडमधील घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या नावाला कलंक भाजपा युती सरकारच्या काळात गुंडाराज; महाराष्ट्रात फोफावलेल्या गुंडाराजचा अंत करा
परभणी व बीड जिल्ह्यात झालेल्या घटना ह्या पुरोगामी महाराष्ट्राला व संताच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार संपवण्याचा हा प्रयत्न आहे. परभणीत पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा झालेला मृत्यू हा पोलिसांनी केलेली हत्या असून या हत्येप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही? राजकीय आशिर्वादाने महाराष्ट्रात …
Read More »अजित पवार यांची माहिती, व्याज दंड माफ करण्यासाठी अभय योजना लागू राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी अडीच ते तीन हजार कोटींची रक्कम जमा होणार
महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, २०१७ विधेयकातील कलम ७३ अंतर्गत वर्ष २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९ च्या कर मागण्यांशी संबंधित व्याज किंवा दंड किेंवा दोन्ही माफ करण्याची अभय योजना (Amnesty Scheme) राज्यात लागू करण्यात आली असून ३१ मार्च २०२५ ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे. त्यापूर्वी देय …
Read More »विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत आतापर्यंत एकूण ४६१ महिला आमदार… महिला मतदारांचा टक्काही वाढलेलाच
विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार सहभागी आहेत. किती तरी आमदारांची निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. तर काही उमेदवारांची …
Read More »उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, आमदार आणि संरक्षक म्हणून जबाबदारी… विधिमंडळाच्या शतकोत्तरी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले मत
शिवाजी महाराजांच्या या महान भूमीने शतकानुशतके आपल्या मातृभूमीच्या प्रगतीचे नेतृत्व केले आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे आणि भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मराठा स्वराज्याची तत्त्वे, त्याच्या प्रशासकीय चौकटीत विकेंद्रित राजनैतिकता, योग्यता, कायद्याचे राज्य, आर्थिक विकास आणि लोककल्याण यांचा समावेश करून, जगभरातील सार्वजनिक सेवा वितरणात अधिक कार्यक्षमता, जबाबदारी आणि उत्तरदायित्व …
Read More »मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के जीवीत व वित्तहानी झाली नसल्याची अजित पवार यांची निवेदनाद्वारे विधानसभेत माहिती
राज्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, वाशीम जिल्ह्यांसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात बुधवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावाजवळ असून सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित किंवा वित्तहानी …
Read More »१० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे प्रयत्न वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
राज्यात १० नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने ५० (एम.बी.बी.एस.) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ …
Read More »उदय सामंत यांची माहिती, बोगस डॉक्टरप्रमाणे बोगस पॅथॉलॉजी लॅब शोध मोहिम कारवाईसाठी लवकरच कायदा आणणार असल्याची घोषणा
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासन लवकरच कडक कायदा आणेल. यामध्ये विना नोंदणी लॅब सुरू असतील, तर त्यांना शिक्षेची तरतूद या कायद्यात असेल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली. तसेच जिल्हास्तरावर बोगस डॉक्टर शोध मोहिमेप्रमाणेच बोगस लॅब शोध मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. …
Read More »मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने येणा-या प्रश्नासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती निर्णय घेणार राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती
मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. शासनाकडे आलेल्या सगेसोयरेच्या हरकतीबाबत सरकारचा निर्णय झाला का, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना शपथपत्र देवून त्यांना प्रमाणपत्र द्यावे, …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना …
Read More »
Marathi e-Batmya