राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असून कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कृषी योजनांच्या लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा निधी व अनुदान प्रलंबित असल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात कृषी मंत्री भरणे यांनी ही …
Read More »सभापती राम शिंदे यांचे निर्देश, मुंबईमधील खासगी कोचिंग क्लास तपासणीसाठी समिती गठित करा तपासणी अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश
मुंबई शहरात सुरू असलेल्या खासगी कोचिंग क्लासची तपासणी करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सर्व संबधित अधिकाऱ्यांची समिती गठित करावी. या समितीने मुंबईमधील खासगी कोचिंग क्लासची तपासणी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा असे, निर्देश विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले. अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता …
Read More »काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी घेतली भेट
विधान परिषदेतील शिवसेना उबाठाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आमदाराकीचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत पदा सध्या रिक्त आहे. तर शिवसेना उबाठाच्या संख्याबळानंतर काँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे …
Read More »राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, १०२ क्रमांक रुग्णवाहिका सेवा सुरळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन… विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान दिली माहिती
राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री …
Read More »उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावर म्हणाले, विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा विधान परिषदेत विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात सभात्याग, बहुमताने विधेयक मंजूर
विधानसभेनंतर महाराष्ट्राचे बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आले. प्रचंड गदारोळात गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सभागृहात विधेयक मांडले. विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केले. त्यावर चर्चा झाल्यानंतर, विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर योगेश कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक सादर …
Read More »मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी
मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …
Read More »आमदार सतेज बंटी पाटील यांचा सवाल, नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी? सरकारने काही सूचना केल्या आहेत का ?
प्राधिकरणाच्या नावाने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळी होत असताना गडचिरोली जिल्ह्यात नवीन खनिकर्म प्राधिकरणाचा घाट कशासाठी घातला जात आहे ? असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. आपला जुन्या व्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे काय? या प्राधिकरणांना काही नविन अधिकार दिले आहेत का ? असा प्रश्नांचा भडीमारही आमदार …
Read More »अंबादास दानवे यांचा सवाल, एक रूपयांची संपत्ती नावावर नसताना ६५ कोटींची निविदा कशी भरली? सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हॉटेल खरेदी प्रकरणी अडचणीत
२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावे एक रूपयांची मालमत्ता नसल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे सांगितले होते. मग कोणतीही मालमत्ता आणि संपत्ती नावे नसताना हॉटेल विट्स खरेदी …
Read More »राज्यमंत्री पंकज भोयर यांची ग्वाही, बोगस शिक्षकभरतीची एसआयटी चौकशी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटीची स्थापना करणार
शिक्षण विभाग म्हणजे संस्कारांची खाण असते. सुविद्य नागरिक शिक्षणातूनच घडतात. पण अशा शिक्षण विभागात लुटारूच बसलेले आहेत, असे आज शिक्षण विभागाबाबत केलेल्या आरोपांमुळे आणि मंत्रीमहादयांनी देखील ते मान्य केल्यामुळे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच भ्रष्टाचाराची खाण बनलेल्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या सहभाग असलेल्या एसआयटी कडून चौकशी करण्यात येईल …
Read More »
Marathi e-Batmya