राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण या प्रश्नाचं उत्तर शरद पवार असे दिलं आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आज जे काही अजित पवारांनी केलं ते काही मला नवीन नाही. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील हे सगळे जण सोडून गेले आहेत. पुढच्या दोन दिवसात सगळं चित्र स्पष्ट होईल पण मी …
Read More »अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार म्हणाले, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो… ज्या आरोपांचा उल्लेख केला आणि ते आरोप ज्यांच्याशी संबधित होते त्यांना सहभागी करून सुटका केली
नुकतेच मध्य प्रदेशातील भोपाळ येथील भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेत टीका केली होती. त्यानंतर आज शरद पवार यांचे पुतणे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी १० ते १२ आमदारांना सोबत घेत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री …
Read More »राज्याच्या राजकारणात भाजपाच्या चार ‘भ’ चा पुन्हा एक बळीः अजित पवारांची बंडखोरी शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांसह राष्ट्रवादीतील बडे नेतेही भाजपाच्या वळचणीला
२०१४ साली महाराष्ट्रासह देशात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच निवृत्त होणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने त्यावेळच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले होते की, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार म्हणजे भाषण, भ्रम, भ्रमंती आणि भय या चार भ च्या आधारे चालणारे सरकार असून यांच्या काळात चार भ शिवाय काहीही …
Read More »शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला
समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची …
Read More »त्या घटनांवरून शरद पवार यांनी टोचले कान, राज्याच्या गृहमंत्र्यांनी बाकीची वक्तव्य करण्यापेक्षा…. पुण्यातील दर्शना पवार आणि मुलीवरील कोयता हल्यावर देवेंद्र फडणवीसांना सुनावले
पुण्यात गेल्या दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या.एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिची राजगडावर हत्या करण्यात आली. तर, सदाशिव पेठेत भर रस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. या दोन्ही प्रकरणांवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले. यावेळी त्यांनी आकडेवारीसहित …
Read More »फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अजित पवारांना….ते विकेट गेल्याचे सांगतायत आम्ही फसवलं पण तुम्ही का फसलात ? फडणवीसांवर पलटवार
एकाबाजूला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीकडून राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच अचानक पहाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र ते सरकार औटघटकेचे ठरले. त्या मागे नेमके कोणं होतं याची उत्सुकता अद्यापही राज्यातील जनतेत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »पंतप्रधानांच्या टीकेला शरद पवार यांचे प्रत्युत्तर, स्वकर्तृत्वशिवाय जनता मतदान करत नाही… सुप्रिया सुळे या स्वर्तृत्वावर निवडूण येतात, कामाचे कौतुक संसदरत्न पुरस्कारने
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह देशातील सर्व विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्या टीकेला आज शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत चांगलेच सुनावले. तसेच पंतप्रधान मोदींनी केलेली टीका अशोभणीय असून प्रत्येक वेळी मुला-मुलींना …
Read More »त्या शपथविधीवरून देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, शरद पवारांनी डबल गेम खेळला.. आधी चर्चा केली आणि नंतर भूमिका बदलली
राज्यात २०२४ च्या निवडणूकांना आता एक वर्षाचा कालावधी राहिलेला असतानाच भाजपाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणूकीत औट घटकेच्या भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. २०१९ साली विधानसभेच्या निवडणूका पार पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस …
Read More »शरद पवार यांनी उघडकीला आणले पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यातील खोटे आरोप
पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा संदर्भावरून विरोधांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा प्रत्युत्तर, शरद पवार म्हणाले ते खरं आहे, पण… शरद पवारांच्या वक्तव्यावरून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
राज्यात एकीकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला असताना आता देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यातही तसेच दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. आधी देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना मुत्सद्देगिरीवरून टोला लगावल्यानंतर त्यावर शरद पवारांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला होता. आता माध्यमांशी बोलताना पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना खोचक शब्दांत …
Read More »
Marathi e-Batmya