राज्यात २०१७ नंतर रास्त भाव दुकानदारांचे कमिशन वाढवले नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचे कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या. मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर …
Read More »राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असण्यावर भर देण्यात येत असून राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड-किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना या धोरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्विलोकन समितीने …
Read More »१२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान शिवछत्रपतींचे चरित्र हे जगण्याची प्रेरणा
शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पान आहे. त्याचे जतन करणे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी मोगलांना नेस्तनाबूत करुन शिवरायांनी पारतंत्र्य उखडून टाकले व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, अशी आज्ञा करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचे, वीरतेचे …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, चंद्रपूरच्या सुधीर मुनगंटीवारांची उमेदवारी रद्द करा
राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश …
Read More »चंद्रपुरात पंतप्रधान मोदी म्हणाले,… लीगच्या भाषेला देश स्विकारणार का?
देशातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीचे वातावरण उन्हाबरोबर चांगलेच वाढताना दिसून आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहिरसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »लक्ष्मी मित्तल ग्रुपसह १९ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
देशाच्या विकासात आता चंद्रपूर महत्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह १९ कंपन्यांशी सामंजस्य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्यांच्या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्या विकासातही हातभार लावेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री …
Read More »सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, ‘ताडोबा भवन’ पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील
‘ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला …
Read More »अरुणा इराणी, रविंद्र महाजनी, मिथुन चक्रवर्ती, हेलन यांनाही पुरस्कार जाहिर
महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक २२ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय, मराठी व …
Read More »कलावंतांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पोहोचवण्याचे काम
महाराष्ट्राच्या संस्कृतीला जगभरात सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम कलावंतांनी केले आहे. या सर्व कलावंतांनी महाराष्ट्राच्या रसिकांची सेवा केली आहे. त्यामुळेच राज्य शासनाने या कलावंतांच्या पुरस्काराच्या सन्मान निधीत दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात यामध्ये आणखी वाढ करण्यात येईल. त्याचसोबत, वृध्द कलावंतांच्या पेन्शन योजनेच्या निधीत वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा …
Read More »
Marathi e-Batmya