देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे सादरीकरण सर्वोत्कृष्ट ठरले आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारकडून या निकालांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या गटात जम्मू-काश्मीर आणि केरळ या राज्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला आहे. यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिरव्या व भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा
तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, …
Read More »प्रजासत्ताक दिना निमित्त महाराष्ट्रातील ८९ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यादी जाहिर
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी …
Read More »अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर तर महाराष्ट्रातील या मान्यवरांना पद्म विभूषण माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पद्मभूषण
केंद्र सरकारने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मान्यवरांना पद्म भूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेने यांनाही मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्कार जाहिर करण्यात आला. तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार …
Read More »यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असून, यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो …
Read More »दादाजी भुसे यांची माहिती. प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर कवायत २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त घेतलेल्या निर्णयाची माहिती
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये एकाचवेळी ‘देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या या कवायती शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमानंतर होणार असून यामध्ये राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांमधून, सात लाखापेक्षा …
Read More »
Marathi e-Batmya