राज्य सरकारच्यावतीने ‘स्वराज्यरक्षक’ छत्रपती संभाजी महाराजांच्या वढू येथील बलिदान व समाधीस्थळाच्या कामाविषयी निवेदन करताना छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केला त्याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे आभार मानले. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने गेल्या अर्थसंकल्पात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान व समाधीस्थळाच्या विकासासाठी …
Read More »राष्ट्रवादीचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना, अजित पवार आणि शिंदे गट भिडले विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल, शरद पवार म्हणतात जनतेला बदल हवाय ते हेच का?
राज्यात अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील उभी पिके भूईसपाट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधकांकडून विधानसभेत करण्यात येत होती. मात्र मध्येच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मागील नागालँडमधील भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचा मुद्दा उपस्थित करत हेच बदलाचे वारे …
Read More »अजित पवारांची टीका, मंत्रिमंडळात एकही महिला नाही हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ;सरकारने नराधमांवर जरब बसवावी...
महिलादिनी तरी राज्याच्या मंत्रिमंडळात महिला आमदारांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली. मंत्रिमंडळात एकही महिला प्रतिनिधी नसणे हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्देव आहे अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. दरम्यान राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधत सरकारने अशा नराधमांवर …
Read More »उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …
Read More »छगन भुजबळ, अजित पवारांचा हल्लाबोल, सरकार रंगाची होळी खेळत असताना… शेतकऱ्यांची 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करा
अवकाळीने ‘जगावे की मरावे’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे हे तात्काळ जाहीर करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृह सुरू होताच केली. गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या …
Read More »अजित पवारांचा आरोप, प्रत्येक आमदाराला मंत्री करतो म्हणून सांगितलं होतं पण… आमचं सरकार असताना सरसकट निधी वाढविला
राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन होताच महाविकास आघाडीतील कामांना सरकारने स्थगिती दिली. आमदारांनी सोबत यावे म्हणून आमदारांना मंत्रिपदाच आश्वासन दिले. त्यामुळे दुसऱ्यांदा मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झाला नसल्याची खोचक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …
Read More »निवडणूक निकालावर अजित पवारांचा खोचक टोला, त्यांच्यातच जोम आहे? आमच्यात जोम नाही? सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आला नाही..
कसब्यात २८ वर्षांपासूनचा भाजपाचा बालेकिल्ला काँग्रेसनं जिंकला असून चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांच्या रुपाने भाजपानं जागा राखली आहे. या निवडणुकांवरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. चिंचवडमध्येही जगताप यांच्याविरोधातील दोन उमेदवारांच्या मतांची बेरीज त्यांच्यापेक्षा जास्त असल्याचं सांगत विरोधकांनी तो भाजपाचा नैतिक पराभव असल्याचा दावा केला. यावरच आज पाथर्डीमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित …
Read More »भरसभेतच अजित पवार म्हणाले, … तर कशाला खोके सरकार आलं असतं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत जाब विचारणार
सध्या चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यातील मुद्दे यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आज भाषणातही अजित पवारांनी सरकारवर विविध मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल केला. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईबद्दल उद्या सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले. आज पाथर्डीमध्ये …
Read More »इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत ०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द झाली आहे. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही, यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली …
Read More »अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नी मंत्री लोढांच्या उत्तराने समाधान झाले नसल्याने विरोधकांचा सभात्याग २० टक्के मानधन वाढीसोबत नवीन भरतीचा निर्णय लवकरच : लोढा
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ५ बैठका मंत्रालयात तर ४ बैठका मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक झाल्या. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर राज्य सरकार सकारात्मक आहे. राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात आजवरची सर्वात मोठी वीस टक्के इतकी वाढ केली जाईल. तसेच २०,१८३ इतकी रिक्तपदे या मे महिन्यांपर्यंत भरली जातील अशी माहिती महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात …
Read More »
Marathi e-Batmya