मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासंदर्भात सादर झालेले अहवाल सभागृहात मांडण्याच्या मुद्यावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र राज्य सरकारकडून वारंवार त्या मागणीकडे दुर्लक्ष करत कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. अखेर विरोधकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुरवण्या मागण्या मतास टाकत त्या एकमताने मंजूर केल्या. त्यामुळे …
Read More »आरक्षणाबाबत निर्णय घेता येत नसल्याने सरकार पळ काढतेय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी आरक्षणाबाबत सरकार चालढकलपणा करण्याचा प्रयत्न करत असून सरकारला निर्णय घेता येत नसल्याने सरकार यापासून पळ काढत आहे असा आरोप विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला. सभागृहनेते चंद्रकांत पाटील हे मागील आठवडयात तेच बोलत आहे आणि आजही तेच बोलत आहेत. त्यामुळे सरकारकडे आलेला मागास आयोगाचा अहवाल आणि टीसचा अहवाल …
Read More »चर्चेसाठी सरकारच्या विरोधकांना मिनतवाऱ्या विरोधकांकडून सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु
मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आणि धनगर आरक्षणासंद़र्भातील टीसचा अहवाल मांडवा या मागणीवरून विरोधकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालविणे अशक्य बनल्याने अखेर राज्य सरकारकडून विरोधकांना भर सभागृहातच कामकाज चालवायचे असल्याने विरोधकांनी आंदोलन सोडून चर्चेला येण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विरोधकांना मिनतवाऱ्या करण्यात येत …
Read More »आरक्षणासंबधीचे दोन्ही अहवाल सादर करा, अन्यथा कामकाज चालू देणार नाही विरोधकांकडून दुसऱ्या आठवड्यातही विधानसभेचे कामकाज तहकूब
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा धनगर आरक्षणासंदर्भातील अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधकांनी दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी पुन्हा केली. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला. तरीही अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज रेटण्याचा प्रयत्न केला. …
Read More »अजित पवार म्हणतात दिलेला शब्द फिरविणाऱ्यातला मी नाही भाजप आमदार शेलारांच्या वक्तव्यावर अजितदादांचा खुलासा
मुंबई: प्रतिनिधी मी माझ्या जीवनात एकदा दिलेला शब्द कधीही फिरवित नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाच्याबाबत मी मांडलेली भूमिका कालही तीच होती आजचही तीच आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर हे आरक्षण न्यायालयात टिकणारे हवे. त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने काय अहवाल दिला? याची माहिती सभागृहाला मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत …
Read More »मराठा, धनगर आरक्षणाच्या अहवालावरून विधानसभा तिसऱ्या दिवशीही तहकूब अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग आणि टाटा सामाजिक विज्ञान अर्थात टीसचा अहवाल विधानसभेत मांडण्याच्या मागणीवरून विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. तसेच हे दोन्ही अहवाल सभागृहात आजच मांडावा या मागणीवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा …
Read More »अखेर मागास आयोगाच्या अहवालावरून अजित पवार यांची सारवासारव अहवाल सभागृहात मांडण्याने आवश्यकच
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केला. हा अहवाल विधानसभेत ठेवणे आवश्यक असून त्यामाध्यमातून जनतेलाही कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभेत यासंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याची सारवासारव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेत केलेल्या वक्तव्यामुळे …
Read More »दुष्काळावरून विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण थांबवावे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आवाहन
मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती असताना विरोधक याप्रश्नावर राजकारण करत आहेत. हा संवेदनशील मुद्दा असून दोघांनी मिळून जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे. तसेच या मुद्यावरून विरोधक खालच्या स्तराला जात असून यासंबधीचे राजकारण थांबविले पाहिजे असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी करत कदाचीत विरोधक भांबावले असल्याने ते असे खालच्या पातळीवरचे राजकारण …
Read More »मुख्यमंत्री…जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटीचा हिशोब दया विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी जलयक्त शिवार योजनेबाबत जलतज्ज्ञांनी हे तांत्रिकदृष्टया योग्य काम होत नसल्याचे आरोप केले होते. जीएसडीएने दिलेल्या २५२ तालुक्यातील १० हजार ५२१ गावांमधील अडीच मीटरने भूजल पातळी घटल्याचा अहवाल दिला आहे मग जलयुक्त शिवार कसले यशस्वी झाले असा सवाल करतानाच यावर खर्च झालेल्या साडेसात हजार कोटी रुपयांचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी दयावा …
Read More »दुष्काळामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार दया आणि भारनियमनमुक्त महाराष्ट्र करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांची मागणी
मुंबईः प्रतिनिधी राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत दया शिवाय महाराष्ट्राला भारनियमन मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना केंद्रांचे पथक येण्याची वाट पाहिली जात आहे. …
Read More »
Marathi e-Batmya