काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत राज्यात महायुतीला अवध्या १८ जागा मिळाल्या. या अठरा जागांना भाजपाचे धोरण कारणीभूत ठरल्याची चर्चा तेव्हापासून राज्याच्या राजकारणात आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाने नाशिकचा उमेदवार जाहिर केला म्हणून पुढील कोणताच उमेदवार शिवसेना शिंदे गटाने जाहिर करायचा नाही अशी बंधने भाजपाने शिवसेनेवर घातल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु …
Read More »महेश तपासे यांचा गौप्यस्फोट, भाजपाच शिंदे व अजित पवार यांचे उमेदवार पाडणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या बैठकीत निर्णय झाल्याचा दावा
राज्यातील विधानसभा निवडणूकांचा कालावधी जवळजवळ येत आहे. त्यातच गणेशोत्सवाचा सणाचे औचित्य साधत भाजपाचे अनेक बडे नेते सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी गणरायाचे …
Read More »रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा… प्रचंड दहशतीत असलेल्यांना धीर देणे चूकीचे काय
मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपासह महायुतीत असलेल्या पक्षांना चांगलाच बसला. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि …
Read More »रविकांत तुपकर यांच्याबरोबरील बैठकीत अजित पवार यांनी दिले हे आश्वासन सोयाबीन, कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह केंद्र शासनाची अनुकुल भूमिका
शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे …
Read More »अजित पवार यांचे आदेश, शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम पर्याय सुचवा पुढील ५० वर्षांची पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रस्ताव पाठवा
पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील घेरा, सिंहगड आणि प्रयागधाम, आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक, बारामती तालुक्यातील नीरावागज, खांडज, घाडगेवाडी तसेच इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या गावांना भेट द्यावी. भौगोलिक परिस्थिती आणि शाश्वत जलस्त्रोतांचा अभ्यास करुन सर्वोत्तम व्यवहार्य …
Read More »महायुतीत अजित पवारांना ४० जागा, शिंदे गटाला ७० तर भाजपा१५० +, मेतकुट जमेना महायुतीच्या बैठकीत अमित शाह यांच्या उपस्थित झालेल्या जागा वाटपाच्या चर्चेवर एकमत
राज्यातील विधानसभा निवडणूका जाहिर होण्यास आता एक महिन्याचा अवधी लागला असून स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने चर्चेला काल अमित शाह यांच्या उपस्थित सुरुवात झाली. या बैठकीत भाजपाने १५० + जागा लढविण्याबाबत जवळपास एकमत झाले असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, केंद्रासाठी महाराष्ट्र लाडका नाही का? मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महायुतीने केंद्राच्या पाया पडावं
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू असताना महायुती सरकारला, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची चूल पेटली नाही तरी देखील राज्याचे कृषी मंत्री सिनेतारकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी मदत मागायची कुणाकडे हा खरा प्रश्न आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेश आणि …
Read More »काँग्रेसची मागणी, राज्यात १८सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी जाहीर करा नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे मागणी
१७ सप्टेंबर रोजी राज्यातील गणेश विसर्जन आहे. त्या दिवशी राज्य सरकारकडून शासकिय सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. तर १६ सप्टेंबर रोजी महमंद पैगंबर यांचा जन्म दिवस आहे. त्यामुळे १६ सप्टेंबर रोजीची महमंद पैगंबर यांच्या जयंती निमित्त जाहिर करण्यात आलेली सुट्टी १८ सप्टेंबर रोजी जाहिर करावी अशी मागणी माजी मंत्री व …
Read More »जाहिरसभेत अजित पवार यांची आवाहन, मी जी चूक केली…ती करू नका धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्येवरून केले आवाहन
राज्यातील पक्षफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून त्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका आता येऊ घातल्या असून या निचवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निवडूण येण्याच्या हमीवर अजित पवार गटातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्ये हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र …
Read More »आता मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांकडून स्विकारणार राज्य सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून शासन निर्णय जारी
आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील महिला वर्गाला (मतदारांना) आकर्षित कऱण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहिर केली. तसेच योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला १५०० रूपये देण्याचा निर्णयही जाहिर केला. या योजनेच्या लाभार्थ्यांना दोन-तीन महिन्याचे हप्तेही देण्यात आले. मात्र यापूर्वी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून या योजनेसाठी अर्ज घेण्यात येत होते. …
Read More »
Marathi e-Batmya