Tag Archives: arjun khotkar

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, उपमुख्यमंत्री अजित पवार या टोळीचे आका आहेत का? एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया! आ. अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करण्याची मागणी

भाजपा महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर …

Read More »

चार महिन्यानंतर विधिमंडळाच्या समित्या जाहिर लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार

राज्य सरकारकडून मागील कालावधीतील केलेल्या चूकीत सुधारणा करत यावेळी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सत्तेवर आपली पूर्ण मांड व्यवस्थित बसविल्यानंतर आणि चार महिन्याच्या कालावधीनंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यावरील नियुक्त्या जाहिर केल्या आहे. विशेष म्हणजे या समित्यांवर महायुतीतील आमदारांचाच वरचष्मा कसा राहिल याकडे महायुती सरकारने लक्ष दिले आहे. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या …

Read More »

कुणाल कामरा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन,…कठोर कारवाई करणार स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्यावरून कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे अर्जून खोतकर यांनी केली. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनीही याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानजनक शब्द …

Read More »

विधानसभेत नितेश राणे यांची आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी तर गृह राज्यमंत्री म्हणाले… दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतची  व्यवस्थापक  दिशा सालियनच्या  मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या  याचिकेचे पडसाद गुरुवार विधिमंडळाच्या  दोन्ही सभागृहात उमटले. विधानसभेत मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सालियन मृत्यू प्रकरणी  आरोप असलेल्या माजी मंत्र्यांना  अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांचा रोख शिवसेना …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत, सुप्रिया सुळेचा हल्लाबोल गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम मावळत्या मुख्यमंत्र्यांकडून

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून उघडकीस आणली. तसेच श्रीकांत पांगारकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी जालना विधानसभेच्या प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविली. पत्रकार गौरी लंकेश …

Read More »

रात्रीच्या उशीराच्या बैठकीनंतरही मनोज जरांगे पाटील भूमिकेवर ठाम दुरूस्तीचा शासन निर्णय आल्याशिवाय उपोषण मागे नाहीच

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर जालना येथील आंतरवली सराटे गावी मनोज जरांगे पाटील सुरु केलेल्या उपोषणाच्या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. या १२ दिवसात कुणबी समाजातील नागरिकांनाही मराठा आरक्षणाचा लाभ मिळावा अशी प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तसेच कुणबी असलेल्यांना मराठा असल्याचे जात प्रमाण पत्र देण्याची मागणीही केली. मात्र …

Read More »

निजाम काळातील मराठा कुणबीच्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांची समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलनाची दखल शासनाने गांभिर्याने दखल घेतली आहे. आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणी नुसार मराठवाड्यातील मराठा समाजाच्या पुर्वजांच्या निजामकाळातील महसूली नोंदी तपासून त्याप्रमाणे मराठा समाजाला कुणबी असे प्रमाणपत्र देण्यात येईल. सचिव महसूल यांची या पुर्वीच नियुक्त समितीच्या मदतीने निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्य …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा, आरक्षण मिळेल नाही तर अंत्ययात्रा निघेल… सरकारला दिली चार दिवसाची मुदत

जालना येथील आंतरवली सराटा गावात मराठा आरक्षण प्रश्नी उपोषण आंदोलनास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची महायुती सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील आपल्या म्हणण्यावर ठाम असल्याचं दिसून आलं तर चार दिवसात मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन या असे शिष्टमंडळाला मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितले. सरकारच्या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री …

Read More »

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ….आरक्षणाचा जीआर घेऊन या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शिष्टमंडळ जाणार जरांगे पाटील यांच्या भेटीला

मराठा आरक्षणाचा जीआर घेवून या चर्चेची दारं खुली केलीत म्हणून तुम्ही मागचे पाढे वाचू नका असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा …

Read More »

अर्जून खोतकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मंत्री दानवे म्हणाले, त्यांनी विधानसभा… ती जागा भाजपाचीच

मागील काही वर्षात जालना आणि औरंगाबादेतील सत्ता संघर्षावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर हे आमने-सामने आले. मात्र आता अर्जून खोतकर यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागल्यानंतर दिल्लीला जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या उपस्थितीत दानवे यांच्याबरोबर समझौता केला. तसेच एकनाथ शिंदे गटात प्रवेशही केला. …

Read More »