Tag Archives: arjun khotkar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल, राऊतांना आमंत्रण दिलंय का? ईडीचे नाव घेऊन येत… नोटीस आली म्हणून कोणी येत असाल तर आमच्याकडे येवू नका

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांची चौकशी होऊ द्या अशी असे सांगत जे काही होईल ते कळेल असे स्पष्ट केले. त्यानंतर स्वतः राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाई झाली तरीही शिवसेना सोडणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर भाजपासह बंडखोर शिंदे गटावर …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीनंतर शिंदे गट म्हणतो ते आमच्याकडे, तर खोतकर म्हणाले… मी अद्याप तसा निर्णय घेतलेला नाही

एकेकाळी उध्दव ठाकरे यांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जाणारे जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी आज सोमवारी २५ जुलै रोजी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे गटाकडून अर्जून खोतकर यांनी पाठिंबा जाहिर केल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला अर्जून खोतकर यांनी अद्याप मी तसा कोणताही निर्णय …

Read More »

पंकजा मुंडे यांना डावलल्यानंतर शिवसेना नेते अर्जून खोतकरांनी दाखविली “ही” तयारी शिवसेनेत येण्याचे निमंत्रण पण निर्णय नेतेच घेतील

राज्यसभे पाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणूकींचा धुराळा उडायला सुरुवात झाली. चर्चेत असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत नसल्याने मुंडे समर्थकांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झाल्याने औरंगाबादमध्ये मुंडे समर्थकांनी भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचाही प्रकार समोर आला. यानंतर त्या पुढील राजकीय वाटचालीबाबत काय भूमिका घेतात याकडे अनेकांचं लक्ष …

Read More »

शिवसेनेचे नाराज राज्यमंत्री सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ? माजी मंत्री अर्जून खोतकर यांची माहिती

औरंगाबादः  प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळांचा विस्तार होवून ६ वा दिवस सुरु झालेला असतानाच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. राजीनाम्याचे पत्र शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी दिली असली तर रविवारी ५ जानेवारी २०२० ला सत्तार हे शिवसेना पक्षप्रमुख तथा …

Read More »

भाजपा-सेनेचे मंत्री पराभूत मुंडे, भेगडे, शिवतारे, शिंदे, खोतकर,बोंडे, फुके यांचा पराभव

मुंबईः प्रतिनिधी अब की बार २२० पारचा नारा देत भाजपा-शिवसेनेने निवडणूकीची घोषणा होण्याआधीच प्रचारात आघाडी घेतली. तसेच मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी महाजनादेश, जनआर्शीवाद यात्रा काढल्या. मात्र या यांत्रांचा परिणाम काही राज्यातील जनतेवर झालेला नसून यात भाजपा-शिवसेनेचे ५ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे दिसून येत आहे. राज्य …

Read More »

दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा

औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …

Read More »

जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम

मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …

Read More »

दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …

Read More »

वस्त्रोद्योजकांनी कापूस-कापड आणि फॅशन उद्योग व्यवसाय विकसित करावा 'वस्त्राय-२०१९’ कार्यशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन

मुंबई : प्रतिनिधी वस्त्रोद्योग हा व्यवसाय कृषी क्षेत्रानंतर मोठा रोजगार निर्मिती करणारा असून जागतिक पातळीवर हातमाग व्यवसायाला मोठी मागणी आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्न (जीडीपी) मध्ये वत्रोद्योगाचा मोठा हिस्सा आहे. राज्यातील वस्त्रोद्योग व्यावसायिकांनी पारंपरिक व्यवसायात गुंतून न राहता जागतिक पातळीवरील बाजारपेठेचा आणि मागणीचा अभ्यास करुन कापड-कापूस-फॅशन असा व्यवसाय विकसित करावा, असे …

Read More »

लसीकरण निविदेत चालढकल करणाऱ्या मंत्र्याची चौकशी कोण करणार? विरोधक आक्रमक तर पदुम राज्यमंत्री खोतकर यांची त्रेधातिरपीट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांची जनावरे असलेल्या बैल, गाय, म्हशींना लाळ-खुरकत रोगाची लागण होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मागील वर्षभरापासून जनावरांना लस देण्यासाठी निविदेचा सातवेळा घोळ घालण्यात येत असल्याने घोळ घालणाऱ्या संबधित पदुम आयुक्त आणि मंत्र्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत राज्य सरकारला चांगलेच धारेवर …

Read More »