केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा मुंबईत येताच काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच्या काँग्रेसच्या पत्रकार परिषदेस उपस्थित राहू शकते नाहीत. आयोजित केलेल्या महत्वाच्या पत्रकार परिषदेस चव्हाण यांनी दांडी मारल्यामुळे काँग्रेसच्या गोटात अधिक खळबळ माजली आहे. आता हाही योगायोग असावा का असे बोलले जाते. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे …
Read More »चव्हाण-फडणवीसांच्या भेटीवरून काँग्रेसच्या नेत्यांकडून डॅमेज कंट्रोल भेटीबाबत आणि चव्हाण भाजपात जाणार असल्याच्या अफवा
गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण …
Read More »या अशोक चव्हाण- देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागे दडलंय काय? खुलासा फक्त फडणवीसांचा तर चव्हाणांची चुप्पी
काल गुरूवारी राज्यातील भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाली. या भेटीबाबत देवेंद्र फडणवीस यांनीच होय माझी आणि अशोक चव्हाण यांची उभ्या उभ्या भेट झाल्याचे मान्य करत चर्चा मात्र झाली नसल्याचा खुलासा केला. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस नेते यांनीही भेट झाल्याचे एकप्रकारे मान्य केले. …
Read More »अशोक चव्हाण म्हणाले, झाडी- डोंगार- हाटिल ओक्के असतील, पण… विधानसभेत शिंदे सरकारवर केली टीका
झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, …
Read More »अशोक चव्हाण यांच्याकडून रस्त्याच्या नावाखाली निधीचा गैरवापर नांदेड महापालिका निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांकडून जनतेची दिशाभूल- खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
नांदेड महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून अशोक चव्हाण यांनी सत्ता जाणार हे निश्चित असतानाही १५० कोटींच्या कामांना मान्यता दिल्याची घोषणा केली. अशा घोषणा करून अशोक चव्हाण हे नांदेडच्या जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …
Read More »ऐन मतदानाच्या रणधुमाळीत फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रंगल्या कोट्या फडणवीस म्हणाले काँग्रेसची मते फुटलीत
राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेचेही निवडणूकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार हे स्पष्ट झाले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेने आपल्या पक्षांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवत यावेळी काहीही करून विजय मिळविण्याच्यादृष्टीने रणनीती राखली गेली. यापार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशीच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, …
Read More »नाना पटोले यांचा इशारा; सूडबुद्धीची कारवाई सहन करणार नाही राहुल गांधींवरील ईडी चौकशीविरोधात राजभवनवर धडक मोर्चा
केंद्रातील भाजपा सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन …
Read More »सोनिया व राहुल गांधींना खोट्या केसमध्ये गोवण्यासाठीच ईडीची नोटीस देशाची लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान: नाना पटोले
केंद्रातील भाजपाचे सरकार मनमानी, अत्याचारी असून विरोधकांनाही संपवण्याचे काम करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना भिती दाखविली जात आहे. उदयपुर शिबिरामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. म्हणूनच सोनिया गांधी, राहुल गांधी यांना खोट्या प्रकरणात अडवण्यासाठी ईडीची नोटीस पाठवली आहे. परंतु अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष …
Read More »काँग्रेस पक्ष भाजपा आरएसएससारखा हुकूमशाह नाही प्रदेश काँग्रेसच्या दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळेची सांगता
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या दोन दिवसांची नवसंकल्प कार्यशाळेत राजकीय, सामाजिक मुद्द्यांसह विविध मुद्द्यांचा सखोल उहापोह करण्यात आला. या शिबिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली व त्यातून एक महत्वाचा दस्तावेज तयार झाला आहे. हा दस्तावेज जाहीरनाम्यासह विविध योजना राबवण्यासाठी उपयुक्त ठरणारा आहे. काँग्रेस पक्ष लोकशाहीला माननारा पक्ष असल्याने या …
Read More »नाना पटोले म्हणाले, सध्या चूक दाखविण्याची परंपरा… संजय राऊत यांच्यासह टीकाकारांना प्रत्युत्तर
एकाबाजूला काँग्रेसला मजबूत करण्याच्यादृष्टीने नुकत्याच झालेल्या राजस्थानातील उदयपुर येथील नवसंकल्प शिबिरात चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना मजबूत कऱण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. मात्र मागील अनेक वर्षआपासून पर राज्यातील उमेदवार महाराष्ट्रातून संसदेत पाठविण्याची परंपरा काँग्रेसने यंदाही सुरु ठेवत आपल्याच ठरावाला हरताळ फासला असल्याचे दिसत असताना …
Read More »
Marathi e-Batmya