Tag Archives: bdd chawl

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला म्हाडाच्या प्रकल्पांचा व प्रस्तावित नियमावलींचा आढावा बीडीडी चाळीच्या सदनिकांचे हस्तांतरणाचे नियोजन

विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत प्रस्तावित सुधारणा यासह म्हाडाच्या विविध अधिनियम अंतर्गत प्रस्तावित सुधारणांचा तसेच म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या बीडीडी चाळ व इतर प्रकल्पांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगर विकास …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत दिले आदेश, पोलिसांच्या घरांसाठीचा प्रस्ताव… नियम झुगारणाऱ्या एसआरए विकासकांवर कडक कारवाई करा

विधानसभा निवडणूका जसजशा जवळ येत आहेत, तसेच सत्ताधारी पक्षाबरोबरच त्यांच्या सहयोगी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचा प्रश्नी आणि वरळीतील बीडीडी चाळीच्या प्रश्नासह झोपु योजनेप्रश्नी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मुंबई महानगरातील पोलिसांच्या घरांसह बीडीडी चाळी, एसआरए …

Read More »

बीडीडी चाळकऱ्यांना मिळणार आता मासिक भाडे, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाला गती द्या

वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्बांधणी प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. मात्र या आढावा बैठकीत बीडीडीतील रहिवाशांना मासिक भाडे देण्याचा निर्णय घेत चाळींच्या कामांना गती देतानाच बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी …

Read More »

या मागण्यावरून बीडीडी चाळकऱ्यांचा निवडणुकांवर बहिष्कार

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पामध्ये स्थानिक अधिकृत दुकानदारांवर अन्याय होत असल्याने त्यांनी येणाऱ्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानदार संघटनेने यासाठी क्रमबद्ध आंदोलनाची रूपरेषा आखली असून पहिल्या टप्प्यात दुकाने बंद ठेऊन एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. बी.डी.डी. चाळ दुकानदार संघटनेची वरळी येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. …

Read More »

१५ लाखात पोलिसांना ५०० चौ.फु.चे घर मिळण्याचा मार्ग मोकळा बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत मिळणार हक्काची घरे: अवघ्या पाच दिवसात शासन निर्णय जारी

बी. डी. डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय गृहनिर्माण विभागाने जारी केला आहे. बी. डी. डी. चाळींमध्ये १ जानेवारी २०११ पर्यंत वास्तव्यास असणाऱ्यांना …

Read More »

बीडीडी चाळकऱ्यांसाठी खुषखबर: पुनर्विकसीत सदनिका घेताना फक्त हजार रूपये भरा नाम मात्र मुद्रांक शुल्क आकरण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी ऐन शहरातील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडीमधील बीडीडीच्या २०७ चाळींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकास झालेल्या सदनिका पुन्हा मुळ चाळकऱ्यांना देताना फक्त एक हजार रूपये मुद्रांक शुल्क आकरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे फक्त एक हजार रूपयात ही ५०० चौरस फुटाची सदनिका मुळ चाळकऱ्यांना …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी थप्पडबाजीची भाषा करणं दुर्दैवी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली खंत

मुंबई: प्रतिनिधी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रमुख जरी असले तरी ते या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा आहे. विरोधकांकडून टीका करण्यात आली असली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून थप्पडबाजीची भाषा करणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी अशी भाषा वापरणे म्हणजे महाराष्ट्रासाठी यापेक्षा दुर्दैवी काही नसल्याची प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना दबंग स्टाईलमध्ये उत्तर, “थप्पड…….झापड” बीडीडी चाळकऱ्यांचे घराचे काम वेगाने पूर्ण करण्याची दिली ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी भाजपाच्या एका नेत्याने नुकतेच प्रसंगी शिवसेनाभवनची तोडफोड करण्याची चिथावणी खोर वक्तव्य केले त्याचाच धागा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सतेजजी आपण घराबाबत ‘डबल सिट’ या चित्रपटाचा उल्लेख केलात, पण आपली तर ट्रिपल सिट आहे. हे ट्रिपल सिट सरकार आहे, हे मुद्दामून बोलतो कारण आतापर्यंत टीका अनेकांनी …

Read More »

पवार म्हणाले, माज दाखविण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी केली; मराठी टक्का जावू देवू नका बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा शुमारंभ प्रसंगी पवारांनी मारली कौतुकाची थाप

मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रावर संकटांवर संकट येत आहेत. मात्र संकटकाळात असतानाही विकासासाठीचा माज दाखविण्याची हिमंत मुख्यमंत्र्यांनी दाखविल्याचे कौतुकोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल काढत या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठीचा घेतलेला पुढाकाराचे सारे श्रेय त्यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले. बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी …

Read More »

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री, खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी २७ जुलै रोजी होणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित …

Read More »