मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या शासकिय कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातची स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे या रूग्णांना मंत्रालयातून पुढील उपचारासाठी नेण्यात आल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. शासकिय कर्मचाऱ्यांचेही कोरोना विषाणूपासून संरक्षण व्हावे या उद्देशाने राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची संख्या ५ टक्केवर आणली आहे. तसेच …
Read More »अन्यथा रूग्णालयांवर कारवाईशिवाय पर्याय नाही संख्या ६० वर नेणार: पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली …
Read More »पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास
परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …
Read More »आम्ही बेरोजगार होतो, पण आता आम्ही देणारे आहोत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेतून यशस्वी झालेल्या तरुणांकडून कोरोना संकटग्रस्तांना मदत
मुंबई : प्रतिनिधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्यावसायिक कर्ज घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिलेले अनेक तरुण आता स्वयंपूर्ण झाले असून कोरोनाच्या संकटात ते आता इतरांना मदत करीत आहेत. काही काळापूर्वी बेरोजगार असलेल्या या तरुणांना महामंडळाने कर्जाच्या रुपाने मदतीचा हात दिला आणि त्यांना व्यवसाय करण्यास प्रेरीत केले. व्यवसायात यशस्वी …
Read More »पंतप्रधान मोदींचे भाकित, कोरोनाला सोबत घेवून चालावे लागणार मुख्यमंत्र्यांबरोबरील आजच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सूचनांचा पाऊस
मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात आपण दोनवेळा लॉकडाऊन केला. या काळात आलेले अनुभव आणि प्रश्नांचे मुल्यांकन करून कोणत्या शहरात, भागात लॉकडाऊनची गरज आहे याबाबतची माहिती घेवून राज्य सरकारांनी लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यावा असे सांगत आपल्या सोबत कोरोना बराच काळ राहणार असल्याचे अशी भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »शनिवारच्या तुलनेत ५० टक्क्याने संख्या कमी, पण ८ हजाराचा टप्पा ओलांडला राज्यात ८०६८ वर पोहोचली संख्या: १९ जणांचा मृत्यू
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत काल शनिवारी अचानक ८ चा टप्पा पार केल्यानंतर सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज रविवारी या संख्येत पुन्हा कितीने वाढ होती याबाबत भीतीचे वातावरण होते. मात्र गेल्या २४ तासात कोरोनाचे रूग्ण निदानाचे संख्या ५० टक्क्याने कमी होत ४४० रूग्णांचे निदान झाले. तर १९ …
Read More »शरद पवार म्हणाले पंतप्रधानांना राज्यासाठीही पॅकेज द्या अन्यथा… राज्याला एक लाख कोटी रूपयांची आर्थिक मदत देण्याचे आवाहन
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांनी लॉकडाऊन केले आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. एकट्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा ३ लाख ४७ हजार कोटी रूपयांचा आहे. मात्र लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत १ लाख ४० हजार कोटी रूपयांची महसूली तूट येणार असल्याने …
Read More »साहित्यिक, सामाजिकक्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या “झुलवा” काराचे निधन मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहिली श्रध्दांजली
मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात दलित साहित्यातील नामवंतानंतर देवदासी प्रथेतील जुलमी धार्मिक रूढीच्या विरोधात आवाज उठविणारे प्रसिध्द झुलवा पुस्तकाचे लेखक उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या कांदबरीने आणि त्यावरील नाटकाने साहित्य, नाट्यक्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. गेले …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंकडून गडकरींना धन्यवाद देत बाकीच्यांना लगावला टोला ३ मे नंतर लॉकडाऊनबाबत परिस्थिती पाहून योग्य निर्णय घेणार असल्याची स्पष्टोक्ती
मुंबई : प्रतिनिधी कोरोनासारख्या संकटकाळात पक्षबाजूला ठेवून राज्य सरकारसोबत या संकटाचा मुकाबला करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींजी आपण केलात. या आवाहनाबद्दल तुमचे खरेच धन्यवाद. मात्र अशा संकटसमयीही इतर जे कोणी घाणेरडे राजकारण करत आहेत, त्यांना यामुळे काही काळ तरी वेळेचे भान येईल अशी अपेक्षा व्यक्त करत भाजपा नेत्याकडून राज्यात …
Read More »महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण आज ८११ रूग्णांचे निदान तर संख्या ७ हजार ६२८ वर पोहोचली
मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या आजाराला रोखण्यासाठी एकाबाजूला राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत असताना दुसऱ्याबाजूला या विषाणूने नियंत्रणात यायचे नाव काही घेत नसल्याचे दिसून येत आहे. या चालू आठवड्यात दुपट्टीने रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या घटना आतापर्यंत तीनवेळा घडल्या. मात्र आज दुपटीहून अधिक रूग्णांचे राज्यात निदान झाल्याचे आढळून आले …
Read More »
Marathi e-Batmya