पुणेः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाने भारावून जात केवळ शिवचरित्राची माहिती प्रसारीत करण्याचे काम अखेरपर्यंत करत राहणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वाजता निधन झाले. त्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास त्यांना शिवभक्त आणि पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभरी पार केली होती. …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी- प्रकृती उत्तम, लवकरच कामावर रूजू सीएमओ कार्यालय आणि खासदार संजय राऊत यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ अजित देसाई आणि डॉ शेखर भोजराज यांनी दिली आहे. तर पुढील तीन ते चार दिवसात मुख्यमंत्री कामावर रूजू होणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी दिली. मानेच्या दुखण्यामुळे काल रूग्णालयात मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री रूग्णालयात दाखल म्हणाले…म्हणलं तरी थोडसं दुर्लक्षच झालं केले आवाहन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रकृतीसंदर्भात निवेदन
मुंबई: प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या प्रकृतीसंदर्भात निवेदन केले असून मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. …
Read More »फडणवीस-मलिकांच्या आरोप प्रत्यारोपावर संजय राऊत म्हणाले…आता हस्तक्षेपाची वेळ मलिक हे एका चीडीतून हे सगळं करतायत
मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …
Read More »मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना केली हात जोडून ही विनंती गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरू नका…राजकिय पोळ्या भाजू नका
मुंबई: प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात …
Read More »आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!
मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा …
Read More »पालखीच्या महामार्गावर काय असावे? पंतप्रधान मोदींनी केल्या या सूचना पालखी महामार्गाच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण कराव्यात-पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंढरपूर : प्रतिनिधी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम पालखी महामार्गाची लांबी अनुक्रमे २३१ व १३० किलोमीटर इतकी असून यासाठी एकूण १२ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. या दोन्ही पालखी महामार्गाच्या बाजूला पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी विशेष मार्ग तयार करावा व या महामार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक विविध सोयी-सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान …
Read More »अहमदनगर मधील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक
अहमदनगर-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री बदल झाला का?” शरद पवारांच्या आवाहनावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला
कोल्हापूर: प्रतिनिधी राज्यात आपल्या विविध मागण्यांप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपावरून आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झालाय का? असा खोचक सवाल …
Read More »एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र… वाचा काय केल्या मागण्या सेवा समाप्ती आणि काढून टाकण्याची कारवाई नको
मुंबई: प्रतिनिधी आर्थिक गर्तेत सापडलेल्या एसटी महामंडळाला कोरोना लॉकडाऊनमुळे आणखीनच आर्थिक नुकसानीत गेल्याने कर्मचाऱ्यांना पगार देणेही महामंडळाला मुश्किल बनले. त्यातच राज्य सरकारचीही अवस्था फारशी समाधानकारक नसल्याने राज्य सरकारलाही निधी देताना हात आखडता घेतला. यापार्श्वभूमीवर आपल्याला विविध मागण्याप्रश्नी संपाचे हत्यार उपसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयाने बेकायदा ठरविल्याने अखेर या कर्मचाऱ्यावर कारवाई …
Read More »
Marathi e-Batmya