चंद्रकांत पाटील म्हणाले, “राज्यात मुख्यमंत्री बदल झाला का?” शरद पवारांच्या आवाहनावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

कोल्हापूर: प्रतिनिधी

राज्यात आपल्या विविध मागण्यांप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून या संपावरून आता चांगलेच राजकारण तापणार असल्याचे चित्र निर्माण झालेले असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा राज्य सरकार योग्य निर्णय घेईल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री बदल झालाय का? असा खोचक सवाल करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शरद पवारांना केला.

कोल्हापूर येथील शंकराचार्य मठात आयोजित पुजेच्या निमित्ताने आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

जे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी करायला हवे होते ते शरद पवार यांनी केलेय. त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री बदल झालाय का? असा सवालही त्यांनी केला.

एसटी कर्मचाऱ्यांच्या एकाही मागण्यावर राज्य सरकार निर्णय घेत नाही. त्यामुळे कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठामच राहणार आहे. याप्रश्नी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आम्ही असू असे त्यांनी सांगितले.

दरम्यान याप्रश्नावरून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचे काम भाजपाने सुरु केले असतानाच दुसऱ्याबाजूला एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यात राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब हे अपयशी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वीही फडणवीस सरकारच्या काळात एसटी महामंडळ हे शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे होते. त्यावेळीही रावतेंकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सर्वसमावेशक तोडगा काढण्याऐवजी ते त्यावर शिवसेना स्टाईलने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होते.

त्यातच मागील दिड वर्षात कोरोना लॉकडाऊनमुळे एसटीच्या अडचणीत आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन काळातही एसटी महामंडळाला आर्थिक उत्पन्नाची संधी असताना केवल दूरदृष्टी नसल्याने हातात असलेली संधी एसटी महामंडळाने घालविल्याचा ठपका यापूर्वीच राज्याच्या वित्त विभागाने ठेवलेला आहे. तरीही एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्यादृष्टीने अद्याप तरी कोणतेही ठोस धोरण निश्चित करण्यात आले नसल्याची चर्चा परिवहन विभागात सुरु आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता महाराष्ट्राचा २०४७ पर्यंत जगातील महत्त्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये समावेश

पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, प्रतिभा, स्वच्छ ऊर्जा, सुव्यवस्थित शहरीकरण, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवरून भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *