कोरोनाचे किर्तन देशात जवळपास दिड वर्षापासून सुरु असून फेब्रुवारी २०२२ ला त्यास दोन वर्षे पूर्ण होतील. या दोन वर्षात सर्वसामान्य, कष्टकरी, वंचित, मध्यम वर्गीय, उच्च मध्यमवर्गीय अशा सर्वचस्तरातील आणि सर्वच वयोगटातील नागरीकांना याचा कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसत चालला आहे. यापैकी ५० टक्केहून अधिक लोकांना त्यांच्या प्रियजनांना गमावावे लागले आहे. तर …
Read More »लसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. …
Read More »१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण
मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार …
Read More »भाजपा म्हणते, मराठा आरक्षण कायद्याची प्रक्रिया राज्यालाच करावी लागणार आमदार अॅड आशिष शेलार यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास वर्ग सूचित टाकण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असला तरी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करुन मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकारची प्रक्रिया पुर्ण होऊ शकत नाही. तसेच संबंधित जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच असल्याचे प्रतिपादन …
Read More »राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर त्या निवडणूका न्यायालयाच्या आदेशाने मात्र कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती
ुंबई : प्रतिनिधी नुकतेच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे, ओबीसींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणूकांना स्थगिती देणे आणि अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित उचित कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेच तिसऱ्या लाटेचा इशारा …
Read More »न्यायालयाच्या निकालामुळे भाजपा नेत्यांच्या दाव्यातील फोलपणावर शिक्कामोर्तब मराठा आरक्षणचा रस्ता आता लांब पल्ल्याचा
मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाविरोधात निकाल देत मराठा समाज हा मागास नसल्याची टीपणी करत आरक्षण संपुष्टात आणले. त्यावर भाजपा नेत्यांनी आकाश पाताळ एक करत न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नसल्याचा आरोप करत आघाडी सरकारला आरक्षण देण्याची इच्छा नसल्याची टीका …
Read More »अजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक
नाशिक: प्रतिनिधी राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकायदक असल्याचे कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने सांगितले असल्याने सावध रहा असे इशारा वजा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. नाशिकमधील आयोजित आमदार सरोज यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …
Read More »मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप
मुंबई : प्रतिनिधी शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकरी वर्गास देत राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. …
Read More »राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर राष्ट्रवादीचा उपरोधिक टोला न्यायालयाच्या निर्णयाची माहिती राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही
मुंबई: प्रतिनिधी ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करत राजभवनाच्या अपुऱ्या ज्ञानावर उपरोधिक टोलाही लगावला. दरम्यान राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र …
Read More »फि भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचा हक्क डावलणाऱ्या शाळांवर होणार ही कारवाई शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश
मुंबई: प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून अनेक शाळांकडून फि भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेच्या वर्गाला प्रवेश न देण्याचे धोरण अवलंबलेले आहे. त्याविरोधात पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करत कडक कारवाई करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाला आज दिल्याची …
Read More »
Marathi e-Batmya