Tag Archives: cm uddhav thackeray

घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला मविआ सरकारने दिला दिलासा २०२१-२२ वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही -बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरापासून यंदाही कोरोना संकटाचा मुकाबला राज्यातील जनता करत आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक समस्येचा सामना सर्वसामान्य नागरीकांबरोबरच सरकारलाही करावा लागत असल्याने यंदाच्यावर्षीही रेडी रेकनरच्या दरात कोणतीही दर वाढ न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेत राज्यातील घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला दिलासा दिल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. …

Read More »

रश्मी शुक्लांपाठोपाठ परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपा बॅकफूटवर फडणवीसांच्या आरोपातील हवा गुल

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आणि पोलिस दलातील बदल्यांप्रकरणी भाजपाने केलेल्या महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. मात्र या दोन्ही प्रकरणात गृह विभागाने केलेले स्पष्टीकरण आणि मुंबई …

Read More »

निवृत्त न्यायाधीश चांदीवाल समिती करणार गृहमंत्र्यांवरील आरोपाची चौकशी सहा महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटीची खंडणी वसुलीचा खळब‌ळजनक आरोप केला. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीची …

Read More »

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या या मागण्या बुडणाऱ्या रोजगाराची नुकसान भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करा

कराड : प्रतिनिधी राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय …

Read More »

बचाने की ताकद किसमे है? परमबीर सिंग आणि त्रिवेदी यांचे फोन संभाषण व्हायरल आयपीएस अधिकाऱ्यांना विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निवृत्त एसीपीला धमकीवजा विनंती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात १०० कोटीं रूपयांच्या खंडणी वसुलीवरून राजकिय वर्तुळात खळबळ माजली असतानाच आपल्या गटातील तीन अधिकाऱ्यांना पोलिस दलाच्या विभागीय चौकशीतून वाचविण्यासाठी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी निवृत्त एसीपी त्रिवेदींना अधिकाऱ्याला फोन करून तक्रार मागे घेण्याबाबत विनंती वजा धमकी फोनवरून दिल्याची संभाषण क्लिप नुकतीच समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. फोनवमधील संभाषणात …

Read More »

मातोश्रीवर बसून त्रास कसा कळणार? लॉकडाऊनला आमचा विरोध भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भूमिका

मुंबई: प्रतिनिधी राज्य सरकार सर्वसामान्यांना एक रुपयाचेही पॅकेज देणार नाही. मात्र, कोरोनावर नियंत्रणाच्या नावाखाली राज्य सरकार जर लॉकडाऊन लागू करणार असेल, तर त्याला आमचा कडवा विरोध असेल, अशी भूमिका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडली‌. तसेच मातोश्रीवर बसून लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा कळणार? असा टोलाही त्यांनी लगावला. पुण्याचे पोलीस …

Read More »

अर्थचक्राला थांबा न देता लवकरच राज्यात लॉकडाऊन मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच …

Read More »

वाढत्या बाधितांच्या पार्श्वभूमीवर हे नवे नियम तर कार्यालयात प्रवेश बंदी मिशन बिगीन अंतर्गत अंतर्गत आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना बाधित संख्येच्या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नवे निर्बंध जनतेसाठी लागू करण्यात आले असून यातील काही नियम १५ एप्रिल तर काही नियम ३० एप्रिल पर्यत लागू राहणार आहेत. त्याचबरोबर पहिल्यांदाच शासकिय कार्यालयात गर्दी होवू नये …

Read More »

भाजपाच्या आरोपांच्या खळखळाटाला मविआकडून थंडपणाने बांध मुख्य सचिवांच्या अहवालाने सुरुवात

मुंबई: विशेष प्रतिनिधी अँटालिया प्रकरणात मनसुख हिरेन यांचा मृत्यूदेह आढळून आल्यापासून राज्यातील राजकिय वातावरण सातत्याने तापत राहिले असून कधी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे तर कधी परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आता पोलिस दलाच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून सातत्याने महाराष्ट्र कधी नव्हे …

Read More »

लॉकडाऊन तुर्तास…. मात्र राज्यात परवा रविवारपासून रात्रीची जमावबंदी रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने काल ३५ हजाराचा आणि आज ३६ हजार रुग्ण संख्येचा टप्पा पार केला असताना या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्याच्यादृष्टीने काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात परवा रविवार २८ मार्च २०२१ रात्रीची जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना …

Read More »