Tag Archives: coastal road

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार कोस्टल रोड उद्या पासून २४ तास खुला

काही वर्षांपूर्वी आपण ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ हे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारात असून वर्षाला किमान ५० किलोमीटरचे मेट्रो मार्ग पूर्ण होत आहेत. तसेच रस्त्यांचे जाळे चांगल्या प्रकारे उभारले जात असून वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका करणाऱ्या दोन महत्त्वाच्या लिंक पुलांचे लोकार्पण करण्यात आले …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, कोस्टल रोड लगतची जागा विकास आराखड्यासाठी आरक्षित करा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा

मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी …

Read More »

मुंबई महापालिकेचा खुलासा, मुंबई किनारी रस्त्यावर कोणतेही तडे, खड्डे नाहीत नागरिकांनी अफवांवर तसेच अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये

बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरुन प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून ठामपणे नमूद करण्यात येते की, सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य …

Read More »

मुंबई समुद्र किनारी रस्त्याची उत्तर वाहिनीचे लोकार्पणः काय आहेत या प्रकल्पाची वैशिष्टै सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत, किनारी रस्त्यामुळे वेळ आणि इंधनाची बचत तर प्रदूषणापासून मुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झाले. किनारी रस्त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत तसेच इंधनामध्ये मोठी बचत होणार असून प्रदूषणापासून मुक्ती मिळण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महाभ्रष्ट युती सरकारची पोलखोल… कोस्टल रोडच्या बोगद्यातील गळतीची जबाबदारी निश्चित करून कारवाई करा

मुंबईच्या विकासात महत्वाचा असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पहिल्याच पावसाळ्यात उघड झाले आहे. करोडो रुपयांच्या कोस्टल रोडचे दोन महिन्यांपूर्वी उद्घाटन झाले असून इतक्या लवकर दुरावस्था कशी काय झाली? हे कसले दर्जेदार काम याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला द्यावेच लागेल, असा प्रश्न विचारून बोगद्यात लागलेल्या गळतीची जबाबदारी निश्चित …

Read More »

मुंबईत होत असलेल्या सागरी किनारा मार्गाची वैशिष्टे माहित आहेत का?

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. …

Read More »

कोस्टल रोडच्या परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार

धर्मवीर संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव गडकिल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी शासन कटिबध्द

मुंबईची लाईफलाईन ठरणाऱ्या सागरी महामार्ग (कोस्टल हायवे) ला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सवात मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. या महोत्सवाला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, आरोग्य मंत्री प्रा. डॅा.तानाजी सावंत, …

Read More »