Tag Archives: congress

जीएसटी, वाढ रोखणारा कर, काँग्रेसची टीका दिर्घकालीन समस्या सोडविण्यात कमी पडले

काँग्रेसने रविवारी सरकारच्या ताज्या जीएसटी सुधारणांवर टीका केली आणि वस्तू आणि सेवा कराला “वृद्धी-दमन कर” असे म्हटले आणि अलीकडील सुधारणा दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यात कमी पडल्या. नवरात्रीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर, पुढील पिढीतील कर सुधारणांचा शुभारंभ केल्यानंतर आणि “जीएसटी बचत उत्सव” (बचत उत्सव) सुरू होण्याची घोषणा केल्यानंतर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करणा-या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांवरच हल्ला

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार किरण ताजणे, योगेश खरे व अभिजीत सोनवणे यांच्यावर गुंडांकडून झालेला अमानुष हल्ला हा अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार आहे. जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडणाऱ्या पत्रकारांना लक्ष्य करून करण्यात आलेली ही मारहाण म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा थेट हल्ला आहे, सरकारने या हल्लेखोर गावगुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …

Read More »

राहुल गांधी यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका, भारताचा पंतप्रधान कमकुवत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावरून काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांचीही मोदींवर टीका

अमेरिकेने अत्यंत कुशल कामगारांसाठी एच-१बी व्हिसावर वार्षिक १००,००० अमेरिकन डॉलर्स (सुमारे ८८ लाख रुपये) शुल्क लादल्यानंतर काँग्रेसने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र हल्ला चढवला, या निर्णयामुळे भारतीय व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना “कमकुवत” नेते म्हटले, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन, शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने संविधान व गांधी विचार स्विकारावा २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दिक्षाभूमी ते सेवाग्राम संविधान सत्याग्रह यात्रा; रा. स्व. संघाला संविधान भेट देणार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …

Read More »

राहुल गांधी यांच्या आरोपाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे डिजीटली उत्तर आरोपच चुकीचे असल्याचा निवडणूक आयोगाचे उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे  प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला. तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ज्ञानेश कुमार लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत कर्नाटकातील आनंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदार संघात बेकायदेशीर पद्धतीने मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याचे काम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एक टीम असून त्याच टीमकडून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरयाणात मतदार यादीतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीपूर्वक डिलीट करण्यात आले आहेत काही ठिकाणी …

Read More »