महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असे मत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३० लाख कोटींचे सामंजस्य करार आणखी १० लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण
दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून, आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांना दिली. यातून ४० लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून आज संवाद साधला, त्यावेळी …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबईतील कंपन्यांशी करार करण्यासाठी ‘दावोस’ कशाला ? दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्व गुंतवणूकविषयी करारांची श्वेतपत्रिका काढा
महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक आणण्यासाठी दावोसला जाणे ही भाजपा महायुती सरकार व फडणवीस यांची इव्हेंटबाजी आहे. यावर्षीही ही इव्हेंटबाजी सुरुच असून ज्या कंपन्यांशी करार करण्यात आले त्यातील काही कंपन्या मुंबईतील आहेत. मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार करण्याची गरजच काय? या कंपन्यांशी मुंबईतच करार करता आले नसते का? असा सवाल करून …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसमधून अनुभवला पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंग ‘ग्रँड टूर’चा थरार ऑनलाईन पद्धतीने अनुभवला देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा अनुभव
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आणि भारतीय क्रीडा विश्वात नवा इतिहास घडवणारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेला सुरूवात झाली. देशातील ही पहिलीच आंतरराष्टीय ‘ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथील आपल्या व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहिले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ला …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, महाराष्ट्र भारताच्या भविष्याचे पॉवर हाऊस पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार
भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार
‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर
महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ …
Read More »जयंत पाटील यांचा सवाल, दावोसनंतरच्या १५ लाख ९८ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार होत्या त्या कुठंयत ? ट्रिपल इंजिन सरकार नोकऱ्या देण्यात फेल
२०१५ पासून प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत, महाराष्ट्र प्रशिक्षण देण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण नोकरी देण्यात ११व्या क्रमांकावर आहे. १३ लाख ३१ हजार लोकांना प्रशिक्षण दिले पण त्यातील फक्त ८० हजार लोकांना नोकरी देण्यात यश आले. म्हणजे १०% बेरोजगारांनाही हे सरकार नोकरी देऊ शकले नाही हे आपल्या राज्याचे दुर्दैव आहे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये करार केलेल्या १९ प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहने राज्यात सुमारे ३ लाख कोटींची नवीन गुंतवणूक येणार
दावोस २०२५ मध्ये महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना सामुहिक प्रोत्साहन योजनेबरोबरच थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यास तसेच अन्य २ प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्पाला विशेष प्रोत्साहने देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. या 19 प्रकल्पामधून रूपये ३,९२,०५६ …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, दावोसमधील गुंतवणूक फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले गुंतवणुकी फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात याव्यात
दावोसमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला डिवचले आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर ही चांगलीच बाब आहे पण ही फक्त PR Activity नसावी म्हणजे झाले ! असा उपरोधिक टोलाही …
Read More »
Marathi e-Batmya