वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अधिक बळकट करण्याचा निर्धार असून या नव्या ‘महा-ग्रोथ’ गाथेकडे जग अपेक्षेने पाहत आहे. महाराष्ट्राची १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी WEF २०२६ महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. गेल्यावर्षी १६ लाख कोटींचे गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले होते. यावर्षी अधिक गुंतवणूक आणण्याचे उद्धिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे.

दावोस येथे होणाऱ्या या परिषदे दरम्यान जागतिक उद्योगसमूह, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी चर्चा करून महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक, औद्योगिक प्रकल्प, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा नुकताच निकाल जाहिर झाला. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *