Tag Archives: developer

शंभूराज देसाई यांची स्पष्टोक्ती, म्हाडाच्या जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी नियमातील बदलांना प्रतिसाद सहा महिन्यात १० प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त

मुंबईतील म्हाडाच्या जीर्ण व धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या नियमांतील बदलांना विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या सहा महिन्यांत १० प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एका प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील म्हाडा पुनर्रचित ३८८ इमारतींच्या …

Read More »

माधुरी मिसाळ यांचे आश्वासन, भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवर कारवाई कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करणार

राज्यात महापालिका क्षेत्रात इमारतींच्या विकासकांना महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असते. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम कायद्यात सुधारणा करण्याकरिता अभ्यास गट स्थापन करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत लक्षवेधी …

Read More »

पवईतील जयभीम नगरातील मागासवर्गीयांची घरे तोडणा-या अधिकारी व बिल्डरवर गुन्हे दाखल माजी मंत्री नसीम खान यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश, ६५० कुटुंबियांना न्याय मिळणार

पवईच्या जयभीम नगरमधील जवळपास ६५० मागासवर्गीय परिवारांवर ६ जून २०२४ रोजी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस, बिल्डर निरंजन हिरानंदानी व स्थानिक आमदार यांनी संगनमताने बेकायदेशीर कारवाई केली. पोलिसांनी घरात घुसून लहान मुले, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांना मारहाण करत जबरदस्तीने घरांवर बुलडोझर चालवून त्यांना बेघर केले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने …

Read More »

विस्डम हॅचचे संस्थापक अक्षत श्रीवास्तव म्हणाले, घरांच्या किंमती कमी होणार नाहीत खासगी विकासकांचे बाजारावर नियंत्रण

लोकप्रिय फिनफ्लुएंसर आणि विस्डम हॅचचे संस्थापक अक्षत श्रीवास्तव यांच्या मते, भारतातील घरांच्या किमती कधीही कमी होणार नाहीत. कारण अगदी सोपे आहे: भारतातील बहुतेक घरे आता खाजगी विकसकांद्वारे विकसित केली जात आहेत, त्यांनी X वरील पोस्टमध्ये स्पष्ट केले. अक्षत श्रीवास्तव यांनी लोक घरमालकाकडे कसे बदल करतात यावर प्रकाश टाकला. “जुन्या काळाप्रमाणे, …

Read More »

जीएसटीचा दिलासा: जून्या खरेदी-विक्रीत ठिकाणावर आधारीत कर नाही जीएसटी परिषदेत घेतला निर्णय-नव्याने प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

प्रेफरेंशियल लोकेशन चार्जेस (PLC) च्या कर प्रक्रियेवर जीएसटी GST कौन्सिलच्या स्पष्टीकरणामुळे घर खरेदीदारांना दिलासा मिळाला, परंतु त्याच्या पूर्वलक्ष्यी लागू करण्याने त्यासंदर्भातील प्रश्न अजूनही शिल्लक आहेत, कारण ७,०००-८,००० कोटी रुपयांची मागील प्रकरणे न्यायालयांमध्ये प्रलंबित असल्याचे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. सोमवारी, जीएसटी परिषदेने पीएलसीच्या कर उपचारांबाबत स्पष्टीकरण जारी केले. त्यात असे म्हटले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, सर्वसामान्यांची विकासकांनी अडवणूक करू नये

विलेपार्ले प्रेमनगर येथे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेवर होत असलेली अतिक्रमणे तातडीने काढावीत आणि यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे निर्देश देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाला दिले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबईत कोणत्याही परिस्थितीत नव्याने झोपड्या आणि अनधिकृत बांधकामे तयार होऊ …

Read More »

झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजुरी देण्यासाठी समिती गठित गृहनिर्माण विभागाचा निर्णय

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… तर मुंबईतील विकासकांवर कारवाई करा दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना …

Read More »