जळगांव : प्रतिनिधी निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत असल्याचा उपरोधिक टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावत मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर …
Read More »राज्यात चाचण्या वाढविल्या पण मुंबईत मात्र कमीच ४२ टक्के वाढविताना मुंबईत केवळ १४ टक्के चाचण्या-फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा …
Read More »मंत्र्यांसह सर्वांनी आधी कोरोनाचा टेस्ट रिपोर्ट दाखवा मगच विधानभवनात प्रवेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला सविस्तर आढावा
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ व ८ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार असून आरटी-पीसीआर कोरोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असल्याची खात्री केल्यानंतरच विधानभवनामध्ये प्रवेश देण्यात येईल. आज यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होऊन सर्व व्यवस्थांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. विधानभवन, मुंबई येथील प्रवेशद्वाराजवळ सन्माननीय सदस्यांसाठी ५ व ६ …
Read More »विधानमंडळ पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे पण कोरोना मुक्त आमदारांनाच प्रवेश ७ आणि ८ सप्टेंबरला घेण्याचा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा खुलासा फसवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक झाल्यानंतरही दावा दाखल करता येतो
पुणे-मुंबई: प्रतिनिधी पुणे येथील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात संचालक आणि निश्चित करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती लपविली. त्याच्या चौकशीचे आदेश पुणे जिल्हा दंडाधिकारी (जेएमएफसी) ने याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त प्रसारीत होताच पाटील यांनी अशा प्रकरणात उच्च न्यायालयात …
Read More »प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची निवडणूक आयोगाला खोटी माहिती: न्यायालयाचे चौकशीचे आदेश राजकिय अडचणीत वाढ होणार
पुणे- मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे महसूल मंत्री म्हणून काम केलेले आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी निवडणूकीसाठी असलेल्या शपथपत्रात खरी माहिती लपवून खोटी माहिती दिली. तसेच स्वत:च्या उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी कोथरूड येथील रहिवासी डॉ.अभिषेक हरिदास यांनी यासंदर्भात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने चौकशी करून १६ …
Read More »फडणवीस सरकारने मंजूर केलेले महसुल विभागातील कारकून बनले आता “महसूल सहाय्यक” राज्य सरकारकडून पदनाम बदलीसंदर्भात आदेश जारी
मुंबई : विशेष प्रतिनिधी सरकारमधील प्रशासनात नेहमीच महत्वाची भूमिका बजाविणारी कारकून जमात ही नेहमीच महत्वपूर्ण मानली जाते. तसेच या जमातीशिवाय दस्तुरखुद्द सरकार आणि जनतेचे पान हालत नाही. सरकारी भाषेत या कारकूनाला लिपिक हा शब्द वापरण्यात येतो. मात्र आता महसूल विभागात कार्यरत असणाऱ्या या जमातीला कारकून अर्थात लिपिक शब्द आवडेनासा झाला …
Read More »भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार गृहमंत्री अनिल देशमुख यांची भीम आर्मी शिष्टमंडळाला आश्वासन
मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर मुंबईसह राज्यभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भीम आर्मीच्या शिष्टमंडळाला दिली. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या देशभरातील आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले होते. या दंगलीचे …
Read More »देशाचा मृत्यूदर १.९२ टक्के, तर मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये ५.४० टक्के मुंबईत संसर्गाचे प्रमाणही १९.७२ टक्के, चाचण्या वाढविण्याची विरोधी पक्षनेते फडणवीसांची मागणी
मुंबई: प्रतिनिधी देशाचा मृत्यूदर १.९२ टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील १७ दिवसांत मुंबईचा मृत्यूदर ५.४० टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकतेच पाठविले. सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले …
Read More »पावसाळी अधिवेशन १४ दिवस चालणार विधिमंडळाकडून तात्पुरती कामकाज पत्रिका तयार
मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यापासून सतत पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. मात्र विधिमंडळ प्रशासनाने सध्या निश्चित करण्यात आलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ७ सप्टेंबर २०२० पासूनच्या तात्पुरती कामकाजाची पत्रिका तयार केली असून व अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष १० दिवसाचे चालणार आहे. तर एकूण १४ दिवस कामकाजाचा कालावधी …
Read More »
Marathi e-Batmya