मुंबईः प्रतिनिधी भाजपने दोन वर्षानंतर विरोधी पक्षाचे काम करायला सुरुवात केलीय ही चांगली गोष्ट आहे असा खरमरीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. भाजपा आता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार असल्याचे जाहीर केले. भाजपाने आपले मनोगत व्यक्त केले ही चांगली गोष्ट आहे. …
Read More »प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतोः महाराष्ट्रात “काय द्याचं” बोला राज्य भाजपाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत आघाडी सरकारवर घणाघात
मुंबई: प्रतिनिधी आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचे मोठे संकट आहे. सरकार कुठे आहे, हे विचारण्याची वेळ आली आहे. एक मुख्यमंत्री आहे, त्यांना कुणी मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आणि जनतेचे मात्र हाल होत आहेत. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे‘ चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली …
Read More »देवेंद्र फडणवीस म्हणाले, …तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची सर्वांनी शांतता पाळण्याचे केले आवाहन
मुंबई: प्रतिनिधी त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकाविणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना ४८ तासांचा अल्टीमेटम कायदेशीर नोटीस पाठवित दिला इशारा
मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका गाण्याच्या व्हिडिओ अल्बमला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा याने फायनान्स केल्याचा आरोप करत त्यासोबतचा फो अमृता फडणवीस यांचा फोटो शेअर केला. त्यावर अमृता फडणवीस यांनी माझी …
Read More »फडणवीस-मलिकांच्या आरोप प्रत्यारोपावर संजय राऊत म्हणाले…आता हस्तक्षेपाची वेळ मलिक हे एका चीडीतून हे सगळं करतायत
मुंबई: प्रतिनिधी सध्या जे काही सुरु आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामीलाच हातभार लागत असून यात आता मोठ्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आलेली आहे. तसेच या दोन्ही पैकी एका नेत्याने आता हे थाबविण्याची गरज आहे. मला माहित आहे की, नवाब मलिक यांच्या जावायावर झालेल्या कारवाईमुळे ते चिडीने हे सगळं करत आहेत. काल मी …
Read More »मलिकांचे आरोप म्हणजे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखे भाजपा नेते आशीष शेलार यांच्याकडून जोरदार पलटवार
मुंबई: प्रतिनिधी हायड्रोजन बाँम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या “बिर्याणी” सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …
Read More »नवाब मलिकांचा हायड्रोजन बॉम्ब बाहेर: फडणवीस आणि अंडरवर्ल्डचे संबध उघड दाऊद हस्तक रियाज भाटी फडणवीसांसोबत सतत कसा? बनावट नोटांच्या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण
मुंबई: प्रतिनिधी दाऊद हस्तक म्हणून ओळखला जाणारा रियाज भाटी हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बरोबर सतत सोबत कसा असायचा, तो भाजपाच्या अनेक कार्यक्रमात कसा सहभागी असायचा अशी प्रश्नांची सरबती करत ज्या रियाज भाटीकडे दोन बनावट पासपोर्ट सापडल्याने त्याला डिआरआयने ताब्यात घेतले होते. मात्र त्याला दोन दिवसात जामिन कसा …
Read More »समेटाऐवजी एसटी अध्यक्ष अनिल परबांकडून ३७६ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई कर्मचाऱ्यांचा संप चिघळला
मुंबई: प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडून सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांना मधाचे बोट दाखवून त्यांच्या अडचणीत भरच घालण्याचा प्रयत्न केला. त्यातच कोरोनामुळे या एसटी कर्मचाऱ्यांना नव्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने थेट राज्य सरकारच्या सेवेत समाविष्ट केल्याशिवाय पगारीचा प्रश्न सुटणार नसल्याची जाणीव झाल्याने याच मुख्य प्रश्नावरून एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार …
Read More »आशिष शेलार म्हणाले, नवाब मलिक यांनी आरोपांचा कबुलीजबाब दिला मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी करावी!
मुंबई: प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा …
Read More »नवाब मलिकांचे फडणवीसांना प्रत्युत्तर, मी उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार सकाळी १० वाजता फोडणार बॉम्ब
मुंबईः प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांची दखल नवाब मलिक यांनी घेत त्यास प्रत्युत्तर देत म्हणाले की, फडणवीस हे फटाका फोडणार होते. परंतु त्यांचा फटाका काही केल्या फुटला पण त्याचा आवाज झाला नाही. परंतु आपण उद्या सकाळी १० वाजता फडणवीस यांनी अंडरवर्ल्डच्या मदतीने मुंबई शहराला कसे वेठीस ठेवले होते याचा …
Read More »
Marathi e-Batmya