Breaking News

Tag Archives: draupadi murmu

महिलांवरील अत्याचारावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या, बस्स आता बस्स कोलकाता येथील डॉक्टर विद्यार्थ्यीवर झालेल्या अत्याचारावरून केले भाष्य

मागील काही वर्षापासून देशातील विविध राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र विद्यमान सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्यावरून स्थानिक पातळीवर जनतेच्या रोषाला प्रशासकीय यंत्रणांना सामोरे जावे लागले. त्यातच बदलापूर येथे दोन चिमुरडींवर अत्याचाराची घटना पुढे आल्यानंतरही शाळेच्या यंत्रणेने आणि पोलिस प्रशासनाकडून हे प्रकरण दडपण्याचा …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु म्हणाल्या की, आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय लोकशाहीवरील मोठा हल्ला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील “सर्वात मोठा हल्ला” असल्याचे सांगत आणीबाणी जाहिर करणे हा देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचे सांगितले. संसदेतील दोन्ही सभागृहांच्या सदस्यांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या बोलत होत्या. सार्वत्रिक निवडणुकांनंतर १८ व्या लोकसभेची …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांना दिली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ इतर मंत्रिमंडळाचे सदस्यांनी ही घेतली मंत्री पदाची शपथ

लोकसभा निवडणूकीत तिसऱ्यांदा विजयी झालेल्या एनडीएची सर्वात मोठी सदस्य संख्या असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी जात सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शपथ दिली. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान पद व गोपनीयतेची शपथ दिली. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाचा आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला पुढी सरकार अस्तित्वात येई पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान पदाची जबाबदारी

केंद्रीय मंत्रिमंडळाने १७ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जून रोजी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्रिमंडळासह राजीनामा दिला. राष्ट्रपतींच्या विनंतीनुसार नवे सरकार स्थापन होईपर्यंत नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहतील, असे राष्ट्रपती भवनाने सांगितले. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार पद्धती’ असे नाव असलेली ही उपचार पद्धती सुलभतेने तसेच परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार असल्याने संपूर्ण मानवजातीसाठी ही उपचार प्रणाली नवी आशा देणारी ठरणार आहे. ही उपचार पद्धती असंख्य कर्करोगग्रस्तांना नवजीवन देण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास …

Read More »

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या किंवा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सरकारी संसाधने संबधित घटनात्मक पदावर असलेल्या मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्यासह विविध महामंडळाचे अध्यक्ष यांच्यासाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस-निमलष्करी दलासह सरकारी लवाजमा तात्काळ आहे त्या ठिकाणापासून …

Read More »

वन नेशन, वन इलेक्शनचा अहवाल रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतींना केला सुपुर्द

साधारणतः २०१९ साली देशात भाजपाच्या बहुमताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर वन नेशन वन इलेक्शन पध्दती लागू करण्याची योजना मोदी यांनी गुजरातमध्ये पहिल्यांदा जाहिर केली. त्यानंतर जून्या संसदेतील शेवटच्या अधिवेशनाच्या कालावधीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली वन नेशन वन इलेक्शन संकल्पना देशात राबविण्यासाठी समितीची स्थापनाही …

Read More »

७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मु म्हणाल्या, राम मंदिर…

मागील दोन वर्षाच्या कालावधीत जवळपास चार ते पाच मोठ्या घटना घडल्या. त्यातील राजपथाला कर्तव्य पथ असे नामकरण करणे, नव्या संसद इमारतीच्या उद्घाटन, आणि राम मंदिराची अयोध्येत उभारणी करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या गैरहजेरीत हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यात आले. वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्षे पूर्ण …

Read More »

रामाच्या पूजेसाठी उद्धव ठाकरे यांचे थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

एकाबाजूला भारत विकासाच्या वाटेने चालल्याचे वक्तव्य करत सांसदीय कारभारातही हिंदूत्ववादी विचारसरणीला आणि प्रथांना प्राधान्य देत केवळ स्वतःच्या नावाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यातच दिल्लीतील नवे संसद भवन असेल, शहिद स्मारक किंवा राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण करण्याचा कार्यक्रम असेल अशा …

Read More »

महाराष्ट्रातील या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी याना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार व मल्‍लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा …

Read More »